बातमी कट्टा दिलीप साळुंखे नेर :- आज १५ रोजी नेर सबस्टेशन येथे देऊर बुद्रुक, खुर्द, भदाणे, नेर,परिसरातील शेतकऱ्यांनी विद्युत पुरवठा खंडित केल्याने शेतकर्यांचा उद्रेक झाला व शेतकऱ्यांनी सुरत नागपुर महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले.
यापूर्वी नेर परिसरातील शेतकऱ्यांनी अभियंत्यांना घेरावही घातला होता.याचे पडसाद विधानसभेत उमटले आमदार कुणाल पाटील यांनी माझ्या मतदारसंघात अवकाळी पाऊस झाला त्यामुळे शेतकर्यांची मोठी अडचण झाली आहे शेतकर्यांची विज तोडणीमुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे विज तोडणी त्वरित थांबली पाहिजे असा प्रश्न विधानसभेत मांडला तसेच काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रभर विज तोडणी त्वरित थांबावी अशी मागणी केली होती.
आणि ऊर्जा मत्र्यांनी दिलेल्या उत्तरात महाराष्ट्रभर पुढील तीन महिने विज तोडणीस स्थगिती दिली वेळोवेळी केलेल्या आंदोलनास यश आल्याने शेतकऱ्यांनी शासनाचे व प्रशासनाचे आभार मानले रास्ता रोको आंदोलनास माजी सरपंच व गटनेते शंकरराव खलाणे,डाॅ सतिष बोढरे, ग्रामपंचायत सदस्य दिपक मोरे,देऊरचे डाॅ विजय देवरे,सागर देवरे,डिंगबर देवरे,श्रावण देवरे,चुडामण महाले,योगेश शेवाळे, अर्जुन शेवाळे,आबा शेवाळे,योगेश शिंदे,भदाणेचे विश्वास पाटील,सुरज मारनर,दिनेश मारनर,आदी मोठ्या संखेने शेतकरी उपस्थित होते.