बातमी कट्टा:- शहादा कडून शिरपूरकडे जाणारी लक्झरी बसच्या चालकाने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात डंपरला मागून धडक दिल्याने बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने तालुक्यातील विखरण बस स्थानकावर सिमेंटच्या दिशादर्शक फलकाला धडक देत अपघात केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली.या अपघातात टेकवाडे येथील 65 वर्षीय वृद्ध जखमी झाला.देवीदास व्यंकट शिरसाठ वय 65 रा.टेकवाडे ता.शिरपूर हे गंभीर जखमी झाले.याप्रकरणी दिनेश ईश्वर कढरे रा. टेंभे ता. शिरपूर यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाखल फिर्यादी नुसार दिनेश ईश्वर कढरे रा. टेंभे व देवीदास व्यंकट शिरसाठ रा टेकवाडे हे शुक्रवारी सकाळी शहादा जाण्यासाठी विखरण येथे रस्त्याच्या कडेला उभे असतांना शहादा कडून शिरपूर कडे जाणारी दीपक ट्रॅव्हल्सची लक्झरी जीजे-०४-एटी- ९८९१ क्रमकांच्या बस पुढे चालणाऱ्या डंपरला रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्न करतांना डंपरला मागून धडक देत चालकाचे नियंत्रण सुटल्याने विरुद्ध बाजूला सिमेंटचे दिशादर्शक फलकाला धडक देत तेथेच उभे असलेले देवीदास व्यंकट शिरसाठ यांना धडक दिल्याने गंभीर जखमी झाले.जखमीस तात्काळ खाजगी वाहणाने शिरपूर येथे उपचारार्थ दाखल केले.अपघातानंतर लक्झरी चालक नाव गाव माहीत नाही हा खबर न देता घटनास्थळा वरून पसार झाला.याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरुद्ध भरधाव वेगात वाहन चालवून वृद्धाच्या दुखापतीस व वाहनाच्या नुकसणीस कारणीभूत असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोना अनिल शिरसाठ करीत आहे.