बातमी कट्टा:- पूजेचे निर्माल्य पुलावरुन तापी नदीत टाकतांंना तोल गेल्याने तरुण तापीनदीत पडला.पोहता येत असल्याने हातपाय झटकत त्याने मदतीसाठी आवाज दिला. ईतर तरुण त्याच्या मदतीला धावले पुलावरुन त्या तरुणाला दोर देऊन काठापर्यंत आणत असतांना मच्छीमारांच्या नावने तरुणाला पाण्याबहेर काढले.यामुळे तरुणाचा जिव थोडक्यात बचावला,देव तारी त्याला कोण मारी या म्हणी प्रमाणे संपूर्ण घटना घडली आहे.

उपस्थितांनी दिलेल्या माहिती नुसार शिंदखेडा तालुक्यातील पढावद येथील मच्छिंद्र पाटील हा 35 वर्षीय तरुण आजारी असल्याने शिरपूर येथे उपचारासाठी जात असतांना घरुन आणलेले पुजेचे निर्माल्य सावळदे तापी पुलावरुन नदीत फेकतांना तोल गेल्याने मच्छिंद्र तापी नदीत पडला. मच्छिंद्रला पोहता येत असल्याने तो हातपाय झटकत मदतीसाठी मोठमोठ्याने आवाज देत होता.यावेळी सावळदे येथील तरुण मंडळी आणि संदीप पवार,बेटावदचे जि.प.सदस्य ललित वारुडे यांनी प्रसंगावधान राखून ट्रक थांबवत ट्रकचा दोर घेऊन नदीत सोडला.दोर धरुन मच्छिंद्र तापी काठा कडे येत असतांना ललित वारुडे यांनी तात्काळ मच्छीमारांची नाव घेत नदीतून मच्छिंद्रला पाण्यातून बाहेर काढले.थोडा उशीर झाला असता तर कदाचित मोठी दुर्दैवी घटना घडली असती.काळ आला होता पण वेळ आला नव्हता असेच म्हणावे लागेल.वेळवेर मदतकार्य झाल्याने तापी नदीत पडल्यावर देखील मच्छिंद्रचा जिव वाचला.
