
बातमी कट्टा:- शिकारासाठी रोज रात्रीच्या वेळेस शेतातील गुरांच्या गोठ्याजवळ बिबट्याचा वावर असल्याचा शेतकऱ्याला संशय होता.पहाटे सुमारास शेतकरी स्वता गोठ्यात लपून बसत बिबट्याचा व्हिडीओ मोबाईल द्वारे चित्रीत केले आहे.

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील दिघावे येथील भाऊसाहेब पवार यांच्या शेताती गुरांच्या गोठ्याजवळ रोज बिबट्याचा वावर असल्याचे लक्षात येताच त्यांनी स्वतः पहाटे आपल्या मोबाईल मध्ये त्या बिबट्याचा व्हिडिओ कैद केला आहे.बिबट्याचा वावर वाढल्याने परिसरातील शेतकरी मोठ्याप्रमाणात त्रस्त आहेत.परिसरातील अन्य पाळीव प्राण्यांवर देखील बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत.रात्रीची वीज असल्यामुळे कांदा, गहू या पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्री शेतात जातांना जिव मुठीत घेऊन शेतात जावे लागते. पिंपळनेर वन विभागाने तात्काळ दखल घेऊन या बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.