
बातमी कट्टा:- धुळे शहरात एक अनोखा विवाह सोहळा संपन्न झाला.या विवाह सोहळ्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.एकाच मंडपात हिंदू आणि मुस्लिम जोडप्यांचा विवाह सोहळा संपन्न झाला.आमदार फारुक शहा यांच्या नेतृत्वात विवाह सोहळा संपन्न झाला.

धुळे शहरातील एमआयएम पक्षाचे आमदार डॉक्टर फारुख शहा यांनी धुळे शहरात अनोखा विवाह सोहळा आयोजित केला होता.हिंदू आणि मुस्लिम जोडपे यांचा एकाच मंडपात विवाह सोहळा संपन्न झाला.या सोहळ्यासाठी हजारो धुळेकरांची उपस्थिती होती.पालकमत्री अब्दुल सत्तार यांच्यासह भाजप आमदार जयकुमार रावल,अपक्ष आमदार मंजुळा गावित अशा सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी देखील या लग्न सोहळ्याला उपस्थिती लावली होती. यावेळेस हिंदू बांधवांनी मुस्लिम पद्धतीचा लग्नसोहळ्याचा आनंद घेतला, तर मुस्लीम बांधवांनी हिंदू पद्धतीने लग्न सोहळा कसा संपन्न होतो याचा अनुभव घेतला. शहरात सामाजिक सलोखा निर्माण व्हावा व शांततामय सहजीवन धुळेकरांनी अनुभवावे, यासाठी हा प्रयत्न केला असल्याचे आमदार शहा यांनी यावेळी सांगितले.
