एकाच झाडावर दोन तरुणांचे मृतदेह आढळल्याने खळबळ…

बातमी कट्टा:- जंगलात एका झाडावर दोन तरुणांचे मृतदेह ठिबक सिंचनच्या नळीने गळफास लावलेल्या स्थितीत आढळल्याने खळबळ उडाली आहे.मृतदेह कुजलेले असल्यामुळे याबाबत कुठलीही ठोस माहिती मिळु शकलेली नाही.ही आत्महत्या आहे की घातपात याबाबत पोलीसांकडून शोध सुरु आहे.कुजलेल्या अवस्थेत मृतदेह असल्याने मृतदेहांची ओळख पटू शकलेली नाही.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार काल दि 31 रोजी सकाळी शहादा तालुक्यातील डोंगरगाव शिवारातील जंगल भागात एका झाडावर दोन तरुणांचे मृतदेह लटकलेल्या स्थितीत आढळल्याची माहिती पोलीस पाटील यांना मिळाली. पोलीस पाटीलांनी याबाबत शहादा पोलीसांना माहिती दिली. शहादा पोलीसचे पथक यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता दोन आनोळखी तरुण ठिबक सिंचनच्या एकाच नळीने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळले.

मृतदेह कुजलेले अवस्थेत असल्यामुळे याबाबत कुठलीही ठोस माहिती मिळु शकलेली नाही.ही आत्महत्या आहे की घातपात याबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे.दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले.मृतदेहांची अद्याप ओळख पटलेली नाही.यामुळे हे दोन्ही तरुण कोण? सदर घटना हत्या की आत्महत्या असे अनेक प्रश्नन उपस्थित होत आहेत.शहादा पोलिसांकडून याबाबत ओळख पटविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सोशल मिडीयावर दोघांचे फोटो व्हायरल करण्यात आले आहे.

WhatsApp
Follow by Email
error: