तहसीलदारासह चारही जण लाचलुचपत पथकाच्या जाळ्यात

बातमी कट्टा:- पंटारामार्फत आठ हजारांची लाच घेतल्याप्रकरणी तहसीलदारांसह चार जणांना लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने ताब्यात घेतले आहे.यात तहसीलदाराला जिल्हाधिकारी कार्यालयातून तर तलाठी,वाहन चालक व खासगी पंटराला तलाठी कार्यालयातून ताब्यात घेतले आहे.

जळगाव वाळुची अवैध वाहतूक करणारे एक डंपर दि 26 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास बोदवड तहसीलदारांच्या पथकाने पकडले होते.यावेळी जागेवर 23 हजार रूपये घेतले. बोदवडे तहसीलदार योगेश्वर नागनाथराव टोम्पे व वाहन चालक अनिल रावजी पाटील यांनी वाहन सोडण्यासाठी दि 30 रोजी 10 हजार रुपयांची मागणी केली होती.तर तलाठी मंगेश वासुदेव पारिसे रा.राजा चंद्रकांत सोसायटी बोदवड याने ही वाळु वाहतूक सुरु ठेवण्यासाठी दरमहा तीन हजार रूपयांची मागणी केली होती. तडजोडीनंतर एकुण आठ हजारांची लाचेची मागणी करण्यात आली होती.

याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागाला तक्रार देण्यात आली होती.लाचलुचपत विभागाने सापळा रचला असता अखेर शुक्रवारी बोदवड येथील तलाठी कार्यालयात तलाठी वाहनचालक आणि पंटर शरद समाधान जगताप यांनी एकुण आठ हजार रूपये घेतांना तिघांना पकडण्यात आले.तर जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी आलेले बोदवडचे तहसीलदार योगेश्वर नागनाथराव टोम्पे यांना जिल्हाधिकारी कार्यालयातून पथकाने ताब्यात घेतले आहे.

WhatsApp
Follow by Email
error: