
बातमी कट्टा:- घरातील सदस्य घर बंद करुन घराच्या छतावर झोपलेले असतांना चोरट्यांनी संधीचा फायदा घेत मध्यरात्रीच्या सुमारास घरात प्रवेश करुन दोन लाखांची रोख रक्कमसह तीन लाखांचे दागिने चोरी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झाले असून चौकशी सुरु आहे.या चोरीच्या घटनेमुळे गावात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार दि 5 रोजी रात्रीच्या सुमारास शिंदखेडा तालुक्यातील विरदेल येथे धाडसी घरफोडी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत दोन लाखांची रोक रख्कमसह तीन लाखांचे दागिने चोरी झाले आहेत. विरदेल येथे दोंडाईचा शिंदखेडा रस्त्यालगत असलेल्या दोन घरांवर चोरांनी घरफोडी केली आहे. यात एका घरातून काही एक मुद्देमाल चोरांच्या हाती लागलेला नाही मात्र पंडित आधार धनगर हे रात्री घर बंद करुन पंडित धनगर व त्यांच्या पत्नी हे घराच्या छतावर झोपले असतांना मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.

यात कपाटातील कपडे बाहेर फेकले तर लोखंडी पेटीला असलेले मोठे कुलूप तोडून पेटीतील अंदाजे दोन लाख 41 हजारांची रोकड पायातील चांदीचे किलोचे कल्ले आठ ग्रँम सोन्याचे टोंगल,दहा ग्रँम वजनाची साखळी असा एकुण दोन लाख 41 हजार रूपये रोख रक्कम व तीन लाखांपर्यंतचे दागिने चोरट्यांनी लंपास केले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.शेतीकरारने करण्यासाठी पंडित धनगर यांनी दोन लाख घरात आणून ठेवले होते.तर दादर विक्रीतून मिळाले 41 हजार रुपये देखील तेथेच ठेवले होते अशी माहिती पंडित धनगर यांनी दिली आहे.घटनास्थळी शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पथक दाखल होऊन चौकशी करण्यात आली आहे.
