
बातमी कट्टा:- शिकारच्या शोधात आलेला बिबट्या विहीरीत पडल्याची घटना घडली असून वनविभाग व पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल होऊन बिबट्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी मदतकार्य सुरु आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार साक्री तालुक्यातील ढवळी विहीर येथे शिकारच्या शोधात आलेला बिबट्या गावातल्या एका विहीरीत जाऊन पडल्याची घटना घडली. घटनेची माहिती गावात पसरताच गावकऱ्यांनी पाहण्यासाठी विहीराजवळ प्रचंड गर्दी केली आहे. गावकऱ्यांच्या मदतीने मोटरीच्या साहाय्याने विहीरीतले पाणी मोटारीद्वरे बाहेर काढण्यात आले आले असून विहीरीत पाणी कमी करण्यात येत आहे.घटनास्थळी वनविभाग व पिंपळनेर पोलीस सँटेशनचे पथक दाखल झाले असून बिबट्याला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
