बातमी कट्टा:- राहत्या घरातच बनावट नोटा छपाई करणाऱ्या दोन संशयितांना शिरपूर शहर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. भरदुपारी पोलीसांच्या पथकाने केलेल्या या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर शहर पोलीस पथकाला गोपणीय माहिती प्राप्त झाली होती त्या माहिती नुसार शहर पोलीसांनी शिरपूर तालुक्यातील सावळदे येथे बनावट नोटा छपाई करणाऱ्या दोन जणांवर कारवाई केली आहे. तालुक्यातील सावळदे येथील राहत्या घरातच बनावट नोटा छपाई करण्यात येत असल्याची गोपणीय माहिती शिरपूर पोलीसांना मिळाली होती.
त्या माहितीच्या आधारे पोलीसांनी शिताफीने सावळदे येथील घरावर छापा टाकत बनावट नोटा व छपाई करण्यासाठी वापरण्यात आलेले प्रिंटरसह इतर साहित्य पोलीसांनी जप्त केल्याचे सुत्रांकडून माहिती प्राप्त झाली आहे.याबाबत शिरपूर तालुक्यातील दहिवद येथील घराची झाडाझती करण्यात आली आहे.पोलीसांकडून उशीरापर्यंत कारवाई सुरु असून अद्यापावेतो ठोस माहिती मिळु शकलेली नाही.
सविस्तर बातम्यांच्या अपडेटसाठी www.Batmikatta.com