बातमी कट्टा:- आंबाच्या झाडाला तरुणाचा गळफास लावलल्या स्थितीत मृतदेह आढल्याची घटना शुक्रवारी 8 एप्रिल 2022 रोजी सकाळी 8:30 वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. याबाबत शिरपूर तालुका पोलीस स्टेशनात नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शुक्रवार 8 एप्रिल 2022 रोजी सकाळी 8:30 वाजेच्या सुमारास अनिल भगवान ठाकरे रा.पळासनेर या 25 वर्षीय तरुणाचा पळासनेर शिवारातील वानसिंग भिलाडा यांच्या शेतातील आंबाच्या झाडाला ओढणीच्या साहाय्याने गळफास लावलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला.
याबाबत वानसिंग भिलाडा यांनी तालुका पोलीसांना खबर दिली असता तालुका पोलीस ठाण्याचे पोहेकॉ संजय धनगर यांनी कर्मचाऱ्यासह घटनास्थळाची पाहणी करीत मृतदेह खाली उतरवून उत्तरीय तपासणीसाठी शिरपुर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविले आले असून शिरपूर तालुका पोलीस स्टेशनात नोंद करण्यात आली आहे.