तापी पुलावरून नदीत उडी, तरुणाची आत्महत्या

बातमी कट्टा:- तापी पुलावरुन तरुणाने आज सकाळी 9 ते 10 वाजेच्या सुमारास नलीपात्रात उडी घेतल्याचे काही नागरिकांनी बघितले.नागरिकांनी तात्काळ धावपळ करत मदतकार्य सुरु करुन पट्टीच्या पोहणाऱ्यांकडून शोध घेतला असता त्याचा मृतदेह मिळून आला आहे.

महेंद्र युवराज पाटील 32 रा नेवाडे ता.शिंदखेडा जि धुळे असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार दि 8 एप्रिल 2022 रोजी सकाळी 9-10 वाजेच्या सुमारास शिरपुर तालुक्यातील गिधाडे येथील तापी नदी पुलावरून एका तरुणाने नदीपात्रात उडी घेतल्याचे काही नागरिकांनी बघितले.नागरिकांनी तात्काळ त्याचा पट्टीच्या पोहणाऱ्यांकडून शोध घेतला.दरम्यान दुपारच्या सुमारास त्याचा मृतदेह आढळून आला.सदर मृतदेह हा शिंदखेडा तालुक्यातील नेवाडे येथील महेंद्र युवराज पाटील या तरूणाचा असल्याचे समजल्यानंतर शिंदखेडा पोलीसात नोंद करण्यात आली आहे.

WhatsApp
Follow by Email
error: