आपल्याकडे कुठलाच अधिकार नसणार तर राजिनामा द्या,शेतकरी संतप्त…

बातमी कट्टा:- शेतात अवेळी फक्त दोन तासच विजपुरवठा होत असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.वेळेत पाणी न मिळाल्यास उभे पिक करपून त्यांचे लाखोंचे नुकसान होणार असल्याने शेतकऱ्यांनी महावितरण विरोधात संताप व्यक्त करत महावितरण विभागाच्या उपकेंद्रातील अधिकारींना धारेवर धरले.आपल्या हा अधिकार नसणार तर राजिनामा द्यावा असे यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी अधिकारींना सांगितले.

धुळे जिल्ह्यातील लामकानी परिसरातील शेतीत अवेळी फक्त दोन तास कमी दाबाचा विजपुरवठा होत असल्याने शेतातील पिके करपून शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांनी लामकानी येथील महावितरण विभागाच्या उपकेंद्रात ठिय्या मांडत संताप व्यक्त केला.महावितरण विभागाकडून जेमतेम दोन तास मिळणारा वीजपुरवठाचा काहीही उपयोग होत नसल्याने तो दोन तासाचा पुरवठाही बंद करून शेतकऱ्यांना व त्यांचा गुराढोरांना खुशाल मरु द्या असा आक्रोश यावेळी शेतकऱ्यांनी केला.संतप्त शेतकऱ्यांनी वीजवितरण उपकेंद्राच्या कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते. सहाय्यक अभियंता आशिष काकडे यांनी वीज तुटवड्याची अडचण मांडून शेतकऱ्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. परंतु शेतकऱ्यांचा संताप असल्याने कार्यकारी अभियंता एस.आर.पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे शेतकऱ्यांचे बोलणे केले.

महावितरणचे अधिकारींनी सांगितले की आमच्या हातात काही नाही.वरील नियोजनानुसार लोडशेडिंग होते.आमचा नाईलाज आहे.यावर संतप्त शेतकऱ्यांनी पाण्याअभावी पिकांच्या नुकसानीची कैफियत मांडत अधिकाऱ्यांना कुठलाच अधिकार नाही तर अधिकाऱ्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली.यावर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसांत जास्त वेळ वीजपुरवठा करण्याचा प्रयत्न केला जाईल असे शेतकऱ्यांना म्हटले आहे.

यावेळी उपसरपंच बाजीराव महाले,शेतकरी दिलीप पाटील,बिपिन पाकळे,बी.सी.महाले,मगन पाटील,विलास महाले,रामचंद्र तलवारे,साहेबराव महाले,सागर पाकळे,सुदाम माळी,सागर तलवारे,देवेंद्र भंडारी,अनिल पाकळे,नारायण गिरासे,दत्ता नागपुरे,युनुस खाटीक,बाबुराव ढिवरे,विनोद महाले, जगन्नाथ तेले,सागर महालेंसह शेतकरी उपस्थित होते.

WhatsApp
Follow by Email
error: