
बातमी कट्टा:- तापी नदी पुलावर काल दि 21 रोजी दुपारी एक दुचाकी संशयास्पदरित्या उभी असल्याचे आढळून आली होती. दुचाकी स्वाराने तापी नदी पात्रात उडी घेतल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता.सदर व्यक्ती कोण याबाबत शोध सुरु असतांना त्या तरुणाचा आज दि 22 रोजी दुपारी मृतदेह मिळुन आला आहे.

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील शिरपूर तालुक्यातील सावळदे लगत तापी नदीच्या पुलावर धुळ्याकडे जाणाऱ्या मार्गावर वाहन धारकांना दुपारी 4 वाजेच्या सुमारास एमएच 41-5481क्रमांकाची होंडा कंपनीची दुचाकी संशयास्पद उभी असल्याचे दिसून आली.सदर दुचाकीवरील चालकाने नदी पात्रात उडी घेतल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र सदर दुचाकी कोणाची असून कुठला आहे याबाबत तर्कवितर्क लावले जात होते.काल उशीराने उडी घेणाऱ्याच्या नातेवाईकांना माहिती मिळाली.तापीत उडी घेऊन आत्महत्या करणारा धुळे येथील साहेबराव शाम खैरणार वय 30 रा.भिमनगर धुळे असल्याचे सांगण्यात आले काल पासून तापीत शोध सुरु असतांना आज दि 22 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास मयत साहेबराव खैरणार यांचा मृतदेह मिळुन आला.नातेवाईकांनी मृतदेह शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले आहे.याबाबत शिरपूर शहर पोलीस स्टेशनात नोंद करण्यात आली आहे.
