शिरपूर साखर कारखाना,दुध संघ, शेतकरी आणि “राजकारण” !!

बातमी कट्टा:- शोषण व्यवस्थेतून शेतकऱ्याला समृद्धीकडे जाण्यासाठी सहकार क्षेत्राकडे बघितले जाते. यासाठीच कदाचित शिरपूर तालुक्यात सहकार चळवळ उभारून दुध संघ असो किंवा साखर कारखाना याची उभारणी करण्यात आली होती. या सहकार क्षेत्रात तालुक्यातील निम्मे पेक्षाही जास्त लोकसंख्या याच्याशी संबधीत होती.पण मात्र राजकारण साध्य करण्यासाठी तालुक्यातील सहकार क्षेत्रावर कुऱ्हाड मारण्यात आली.मासे पकडण्यासाठी योग्य पध्दतीने जाळं पाण्यात टाकावे लागते आणि एकदा मासे जाळ्यात अडकले की मग मासेंनी कितीही प्रयत्न केला तरी ते पुन्हा पाण्यात जाऊ शकत नाहीत.अशाच पध्दतीने शिरपूर तालुक्यात घडले आणि तालुक्यातील सहकार क्षेत्राला संपवण्यात आले.

असे म्हटले जाते की,शिरपूर सहकारी साखर कारखाना किंवा दुध संघ हा तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याचा दैनंदिन जीवनाचा एक भाग बनला होता.तालुक्यातील ग्रामीण भागातील अथिर्क व्यवस्था या सहकार क्षेत्रावरच अवलंबून होती.त्याकाळी गळित हंगामात रोज कित्येक टन ऊस गळित करण्याची क्षमता या साखर कारखान्याकडे होती.तर शिरपूर तालुक्यातून चक्क टँकरच्या टँकर भरून दूध मेट्रो सिटीत रवाना होत असे.यामुळे तालुक्यातील शेतकरी व शेतमजूर सुखी आणि समाधानी होते.या सहकार क्षेत्रामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरीसह भूमिहीन शेतमजुरांना देखील रोजगार उपलब्ध झाला होता.

सहाजिकच आहे की,गरज नसतांना कोणीही कोणाला विचारत नाही. त्यामुळेच कदाचित तालुक्यातील शेतकरी सुखी समाधानी राहिले तर राजकीय नेत्यांना कोणीही विचारणार नाही.यामुळेच तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हक्काची सहकार क्षेत्रात राजकारण घालून ते हळूहळू बंद पाडण्यात आले.वर सांगितल्यानुसार मासे पकडण्यासाठी योग्य पध्दतीने जाळं पाण्यात टाकावे लागते आणि एकदा मासे जाळ्यात अडकले की मग मासेंनी कितीही प्रयत्न केला तरी ते पुन्हा पाण्यात जाऊ शकत नाहीत.

तालुक्यातील शेतकऱ्यांचा हक्काचा सहकार क्षेत्रावर घाव घातला गेला आणि आजतागायत त्या क्षेत्राला बंद अवस्थेत ठेवण्यात आले.राजकारणात आमची एवढी मोठी ओळख, अशी ओळख वगैरे वगैरेच्या कौतुक केले जाते मग हा शिरपूर तालुक्यातील शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना का पुन्हा जिंवत करु शकत नाहीत बर ? कारण कारखाना सुरु झाला तर राजकारण करता येणार नाही.बंद कारखान्यावर यापूर्वीही राजकारण केले गेले आणि यापुढेही राजकारण केले जाईल मात्र राजकारणासाठीच कदाचित साखर कारखाना सुरु केला जाणार नाही !

अमोल राजपूत 9404560892

WhatsApp
Follow by Email
error: