
बातमी कट्टा:- शिरपूर येथील कंपनीत कामानिमित्त आलेल्या 25 वर्षीय युवती आपली गावी जात तीन दिवसांपासून घरी न आलेल्या युवतीचा डोंगराळ भागातील अज्ञातस्थळी मृतदेह आढळून आल्याची खळबळजनक घटना घडली आहे.घटनास्थळी मृत युवतीच्या डोक्यावर वार असल्याचे दिसून आले आहे.घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झाले होते.मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील कुंडल येथील 25 वर्षीय ललिता मोतीराम पाडवी ही शिरपूर येथे कंपनीत कामानिमित्त आली होती.तीन दिवसांपूर्वी मयत ललिता पाडवी ही शिरपूरहुन शहादा मार्गे आपल्या कुंडल गावी येत असल्याची माहिती आई वडीलांना दिली होती.मात्र त्यानंतर वारंवार फोन करुनही युवतीचा फोन बंद येत असल्याने आई वडील चिंतेत होते. दोन दिवसांपासून ललिता पाडवी हिचा शोध सुरु होता. यावेळी धडगाव शहरापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या हरणखुरी ते सोमणा परिसरातील डोनगराळ भागात काल रात्री तिची बॅग व कागदपत्रे सामान मिळुन आले त्याच्या पाचशे मिटर अंतरावर ललिताचा मृतदेह मिळुन आला.तीच्या डोक्यावर वार झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे.याबाबत पोलीसांकडून अधिक तपास सुरु आहे.
