काळ आला होता… पण वेळ नव्हती !! भीषण अपघातात भावी नवरदेव बालंबाल बचावला…

बातमी कट्टा:- भरधाव (एसटी) बसने समोरील बोलेरो वाहनाला जोरदार धडक दिल्याची घटना आज दि 4 रोजी दुपारी घडली. या अपघातात बोलेरो वाहन चक्काचूर झाले आहे.सुदैवाने बोलेरो वाहनातील भावी नवरदेव बालंबाल बचावला आहे. बस चालक दारुच्या नशेत बस चालवत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर खर्दे रस्त्यावर अमळनेर कडून शिरपूर कडे येणाऱ्या एम.एच 14 बिटी 1802 क्रमांकाच्या भरधाव बसने शिरपूर कडून शिंदखेडाच्या दिशेने जाणाऱ्या एम.एच 18 ऐजे 7788 क्रमांकाच्या बोलेरो वाहनाला जोरदार धडक दिली.या धडकेत बोलेरो वाहनाचा एक भाग चक्काचूर झाला. बोलेरो वाहनाला धडक दिल्यानंतर बस पुढे जाऊन थांबवत बस चालक बस सोडून फरार होण्याच्या मार्गवर असतांना उपस्थित नागरिकांनी बस चालक मधुकर सदाशिव देवरे वय 45 रा.खडखदेवळा ता.पाचोरा याला रोखून घटनास्थळावर पोलीस व शिरपूर आगारचे आगार प्रमुख वर्षा पावरा साहाय्यक वाहतूक अधीक्षक मनोज पाटील यांना घटनेची माहिती दिली.

घटनास्थळावर पोलीस प्रशासन व शिरपूर आगार प्रशासन दाखल झाले.यावेळी बस चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप फिर्यादीकडून करण्यात आला आहे.बस चालक मधुकर देवरे यांना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी साठी पाठविण्यात आले.याबाबत पोलीस स्टेशन येथे पुढील कारवाई सुरु आहे.

बसने(एसटी) बोलेरो वाहनाला दिलेल्या धडकेत बोलेरो वाहन चालक अमरदिप जितेंद्रसिंग गिरासे वय 30 रा.पळासनेर ता.शिरपूर हे बालंबाल बचावले आहे. बसच्या जोरदार धडकेत बोलेरो वाहन चक्काचूर झाले आहे तर अमरदीप गिरासे यांच्या हाताला गंभीर दुखापत झाले आहे. अमरदीप गिरासे यांचा दि 17 मे रोजी विवाह असल्याने पत्रिका वाटप व भांडे घेण्यासाठी जात असतांना हा अपघात घडला आहे.

WhatsApp
Follow by Email
error: