अवैध गॅस सिलेंडरवर कारवाईचा भडका…

बातमी कट्टा:- घरात साठवून ठेवलेला अवैध सिलेंडर साठावर तहसीलदारांच्या पथकाने कारवाई केली आहे. या कारावाईत 34 सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुळे तालुक्यातील मौजे धनुर गावातील विजय आनंदा भामरे यांच्या राहत्या घरी धुळे ग्रामीणचे तहसीलदार गायत्री सैंदाणे,अधिनस्त पुरवठा निरीक्षक अधिकारी मायानंद भामरे यांच्या पथकाने विजय भामरे यांच्या पत्नीच्या मालकी असलेल्या घरी अचानक भेठ दिली.

यावेळी घराच्या पहिल्या खोलीत भारत गैस कंपनीचे 14 किलो 200 ग्रँम वजनाचे एकुण 17 सिलेंडर मिळुन आले यात 15 सिलेंडर पुर्ण क्षमतेने भरलेले.या व्यतिरिक्त हिन्दुस्थान पेट्रोलियम कंपनी (एचपी) चे एकुण आठ पैकी 4 सिलेंडर पुर्ण क्षमतेने भरलेले आढळून आले.तसेच इण्डेन गैस कंपनीचे एकुण 9 रिकामे सिलेंडर असे 76 हजार किंमतीचे एकुण 34 सिलेंडर मिळुन आले.

सदर सिलेंडर विक्री साठी आणलेले असून विजय भामरे स्वता गॅस सिलेंडर विक्रीचा व्यवसाय करीत असल्याचे आढळून आले.यावेळी सिलेंडर साठवणूकचा कोणताही परवाना नसल्याचे आढळून आले.याप्रकरणी सोनगीर पोलीस स्टेशनात धनुर येथील विजय भामरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

WhatsApp
Follow by Email
error: