पोलीसांनी हळूच झोपडीचा दरवाजा उघडला अन् बनावट दारु बनवितांना एकाला रंगेहाथ पकडला…

बातमी कट्टा:- पोलीसांनी अचानक पणे टाकलेल्या धाडीत झोपडीत सुरू असलेला बनावट दारु बनविणाऱ्या एकाला रंगेहाथ ताब्यात घेतले आहे.पोलीसांनी या कारवाईत प्लास्टिक बुच, स्पिरीट,सुगंधीत लिक्विड,दारुच्या खाली बॉटल्स आदी मुद्देमाल जप्त केला आहे.

दि 15 रोजी शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे सा.पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांना गोपणीय माहिती प्राप्त झाली होती त्या माहितीच्या आधारे निरीक्षक सुरे शिरसाठ यांनी पथकाला कारवाईची माहिती देत सुरेश शिरसाठ ,पोसई भिकाजी पाटील, संजय धनगर,भुषण चौधरी,इसरार फारूकी,संतोष पाटील आदी जणांनी शिरपूर तालुक्यातील बोराडी गावातील रामा सखाराम पावरा याच्या झोपडीवर छापा टाकला असता झोपडीत रामा पावरा हा काचेच्या बाटली मध्ये बनावट दारु तयार करुन ती बाटल्यांमध्ये भरतांना आढळून आला.त्याला पोलीसांनी ताब्यात घेत घटनास्थळावरुन बुच,स्पिरीट,सुगंधीत लिक्विड,दारुच्या खाली बॉटल्स आदी मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

बोराडी येथील रामा पावरा विरुध्द शिरपूर तालुका पोलीस स्टेशनात आरीफ पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोसई भिकाजी पाटील करीत आहेत.

WhatsApp
Follow by Email
error: