
बातमी कट्टा:- मोटारसायकल व ओमनी वाहनाच्या भीषण अपघातात बहिण व भाऊ दोघांना गंभीर दुखापत झाल्याची घटना दि 12 रोजी सायंकाळच्या सुमारास घडली आहे. दोघांवरही शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दि.१२ रोजी सायंकाळी ५.३५ बोराडी-वाघाडी रस्त्यावरील येथील कब्रस्तान समोर शिरपूरहून येणाऱ्या मोटरसायकल क्रमांक एम एच.17.बिएफ०३६६ वर सुरेश रमेश ठाकरे वय-२३ व सरस्वती सरस्वती रमेश ठाकरे वय-२० हे दोघे बहिण भाऊ गावाकडे चालले होते. बोराडी कडून शिरपूरकडे ओमनी गाडी क्रमांक एम एच ३९.जे १७५४ जात असताना मुस्लिम कब्रस्तान समोर ओमनी गाडीचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या विरुद्ध दिशेला जाऊन समोरून येणारी मोटारसायकलला जोरदार धडक दिली.या मोटरसायकल वरील दोघे बहिण-भाऊ पन्नास फूट दूर पर्यंत फेकले गेले या दोघांना डोक्याला व पायाला जबर दुखापत झाल्यामुळे त्यांना तातडीने बोराडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

मोटरसायकल वरील दोघे बहिण-भाऊ हे बोरपाणी गावातील रहिवासी असून सरस्वती रमेश ठाकरे हि इयत्ता एफ.वाय्.बी.ए ला शिरपूर येथे शिक्षण घेत होती. तिला सुट्ट्या लागल्याने भाऊ सुरेश ठाकरे हा शिरपूरहुन बोरपाणी गावाकडे जात होते. अपघाताचे वृत्त कळताच बोरपाणी गावातील आई-वडील व नातेवाईक यांनी धाव घेवून फॅन्सी चप्पल घटनेचे चित्र पाहत असतात त्यांना रडू कोसळले. अपघाताची नोंद रात्री उशिरापर्यंत सांगली पोलीस स्टेशन येथे नोंदवण्यांचे काम सुरू होते.