
बातमी कट्टा:- शिरपूर चोपडा रस्त्यावर अपघात झाल्याची घटना घडली आहे.मालवाहू वाहन आणि सिक्युरिटी गार्डच्या वाहनामध्ये धडक होऊन वाहन रस्त्याच्या बाजूला पलटी झाले आहे. अपघातात जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर अवस्थेत असल्याने एकाला धुळे रवाना करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार आज दि 18 रोजी शिरपूर चोपडा रस्त्यावर कंजर बाबा मंदीर जवळील पेट्रोल पंप दरम्यान कंपनीतून सिक्युरिटीचे काम आटोपून घरी जाणाऱ्या सिक्युरिटी गार्डच्या वाहनाचा समोरून येणाऱ्या मालवाहू वाहनाचा अपघात झाला यात वाहन रस्त्याच्या बाजूला पलटी झाले.घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत जखमींना शिरपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील काही रुग्ण इंदिरा मेमोरियल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे तर एकाला गंभीर दुखापत झाल्याने धुळे येथे पाठविण्यात आले आहे.
