बातमी कट्टा:- धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संपूर्ण महाराष्ट्रात हादरुन सोडणारे रॅकेट उघड केले आहे.बनावट कागदपत्रांच्या साहाय्याने महागड्या ट्रकची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून 12 ट्रक जप्त करण्यात आल्या आहेत तर 27 ट्रकांचा शोध घेण्यात येत आहे.यात एका आर.टी.ओ एजंटला देखील पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार धुळे येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संपूर्ण महाराष्ट्रात हादरुन सोडणारे रॅकेट उघड केले आहे. बनावट कागदपत्रांच्या साहाय्याने महागड्या ट्रकची विक्री करणाऱ्या टोळीचा पथकाने पर्दाफाश केला आहे.या टोळीने धक्कादायक खुलासे केले बनावट कागदपत्रांच्या साह्याने विकले जाणारे १२ ट्रक आतापर्यंत स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केली असून अजून २७ ट्रकचा शोध घेण्यात येत आहे.या प्रकरणी साजिद शेख आणि आर टी ओ एजंट इफ्तेकार अहमद उर्फ पापा एजंट या दोघांना ताब्यात घेतले आहे.जप्त करण्यात आलेले ट्रक या चोरीच्या आहेत कि कर्ज काढून घेतलेल्या आहेत याचा शोध स्थानिक शाखेच्या पथकाकडून सुरु आहे.या ट्रकांची वेगवेगळ्या राज्यात नोंदणी करण्यात आली असल्याने ही टोळी संपूर्ण देशात असल्याचा संशय पोलीसांना आहे. पोलिसांनी एक कोटी ४४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.