आ.अमरिशभाई पटेल,आ. काशिराम पावरा,भूपेशभाई पटेल यांच्या प्रयत्नाने पाटचारी नं. 10 व 12 मध्ये अनेर धरणाचे आवर्तन सोडून जलपूजन, शेतकऱ्यांमध्ये आनंदी वातावरण

बातमी कट्टा:- माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा, प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन भूपेशभाई पटेल यांच्या प्रयत्नाने अनेर धरणाच्या पाटचारी नं. 10 व 12 मध्ये अनेर धरणाचे आवर्तन सोडून जलपूजन करण्यात आले. पाण्याची मोठ्या प्रमाणात उपलब्धता होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदी वातावरण निर्माण झाले असून शेतकरी व ग्रामस्थ पटेल परिवाराला धन्यवाद देत आहेत.

मांजरोद येथे अनेर धरणाच्या पाटचारी नं. 10 व 12 मध्ये उन्हाळी आवर्तन सोडून शुक्रवारी दि. 20 मे रोजी सकाळी 10 वाजता आमदार काशिराम पावरा, प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन भूपेशभाई पटेल यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.

यावेळी आमदार काशिराम पावरा पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्याशी चर्चा करतांना म्हणाले की, माजी मंत्री अमरिशभाई पटेल, प्रभावी व्यक्तिमत्त्व भूपेशभाई पटेल यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे अनेर धरणातून उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले. शेतीसाठी व पिण्यासाठी पाण्याची कमतरता भासू नये म्हणून भाईंच्या प्रयत्नाने तातडीने पाटचारी मध्ये आवर्तन सोडण्यात आले. तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे भले कसे होईल यासाठी पटेल परिवार नेहमीच तळमळीने काम करतात. त्यांच्या योगदानातून तालुक्यात विकासाची अनेक कामे होत आहेत. शिरपूर तालुक्‍याला लाभलेले ते कोहिनूर हिरे आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नाने सर्वच क्षेत्रात अविरतपणे काम सुरू आहे. त्यांनी अनेक क्षेत्रात मोठे काम केले आहे. पटेल परिवाराच्या योगदानातून तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या हितासाठी भूजल पातळी वाढविण्यासाठी तसेच शिरपूर पॅटर्नचे 328 पेक्षा जास्त बंधारे बांधून तालुक्यांतील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा मनापासून प्रयत्न केलेला आहे.

यावेळी आमदार काशिराम पावरा, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष के. डी. पाटील, पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी पी. बी. पाटील, शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया, संचालक अविनाश पाटील, मांजरोद सरपंच भुलेश्वर पाटील, गोपाल पाटील, रितेश पाटील, संजय राजपूत, मोतीलाल पाटील, स्वप्निल पाटील, महेश पाटील, कांतीलाल पाटील, सुनील पाटील, गोपाल सर, राजेंद्र पाटील, रवींद्र पाटील, अनिल पाटील, विजय जोशी, एकनाथ राजपूत, सत्यजीत चौधरी, रमेश पाटील तसेच भाटपुरा येथे उपसरपंच रोशन सोनवणे, संजय महाजन, युवराज चौधरी, संजय वाघ, कल्पेश शिरसाठ, सुधाकर पाटील, शिरपूर पॅटर्न प्रकल्प संचालक टी.आर. दोरिक, इंजिनीयर चव्हाण, पंचक्रोशीतील, पदाधिकारी, शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.

WhatsApp
Follow by Email
error: