
बातमी कट्टा:- घरामागील साठवून ठेवलेल्या चाऱ्याला लागलेल्या भीषण आगीत घरात आगीने भडका घेतला.या आगीत एका 60 वर्षीय वृद्ध महिलेचा होरपळून मृत्यू झाल्याची भीषण घटना घडली असून यात तीन गोवंश जनावरे मृत पावले तर दोन मोटरसायकलींसह संपूर्ण घर जळून खाक झाले.आईला विचविण्यासाठी गेलेल्या मुलगा आगीत जखमी झाल्याची घटना आज दि 28 रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार आज दि 28 रोजी दुपारच्या सुमारास शिरपूर तालुक्यातील नागेश्वर बंगला गावातील कैलास बाबू चव्हाण आणि नवशीबाई बाबू चव्हाण यांच्या घराच्या मागच्या बाजूला चारा साठवून ठेवला होता.त्या चाराला अचानक आग लागल्याने आगीने रुद्रावतार धारण केल्याने संपूर्ण आग घराच्या दरवाजाच्या बाजूने पसरल्याने घरातील नवशीबाई बाबू चव्हाण या घरातच अडकले त्यांना बाहेर निघणे शक्य झाले नाही.

तर पुढच्या दरवाजामधून घरातील ईतर सदस्य जेमतेम बाहेर निघाले होते.आगीची माहिती गावात पसरताच गावातील नागरिकांनी आग विझविण्यासाठी धाव घेतली तर नवशीबाई चव्हाण यांचा मुलगा कैलास बाबू चव्हाण हे नवशीबाई चव्हाण यांना वाचवण्यासाठी गेले मात्र भयंकर आगीमुळे ते शक्य झाले नाही.यात कैलास चव्हाण जखमी झाले.अग्निशमन बंब देखील घटनास्थळी दाखल होऊन दुपारी आग आटोक्यात आणली मात्र त्या वेळेत नवशीबाई या वृध्द महिलेसह तीन गोवंश जनावरांचा मृत्यू झाला तर दोन मोटरसायकलींसह संपूर्ण घर जळून खाक झाले आहे.
