बातमी कट्टा:- शिंदखेडा तालुक्यातील टाकरखेडा परिसरात गुरे चरण्यासाठी गेले असतांना ज्वारीच्या शेतात गुरे चरतांना विषबाधा झाल्याने 10 गुरे मृत्युमुखी पडले तर 90 पेक्षाजास्त गुरांचे पशुवैद्यकीय विभागाच्या पथकाने उपचार करून प्राण वाचविले.लाखो किंमतीचे दहा गुरे मृत्युमुखी पडल्याने डोळ्यात अश्रू अनावर झाले.


याबाबत अधिक माहिती अशी की, टाकरखेडा येथील दिनेश रोहिदास ठाकरे व अरुण काशिनाथ ठाकरे यांचा गुरे चारण्याचा व्यवसाय असून ते गावातील गुरे चारण्यासह मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत असतात दि. 27 रोजी दुपारी दहा वाजेच्या सुमारास टाकरखेडा शिवारात आपले शेकडो गुरे घेऊन चारण्यासाठी गेले असता भर उन्हात ज्वारीच्या शेतात पीक कापल्यानंतर जे खुटवे असतात त्यांना हिरवी पालवी फुटते त्यात पिकाच्या शेतात गुरे चारत असतांना काही वेळानंतर 10 गुरांना विषबाधा झाल्याचे समजले.याप्रसंगी दिनेश ठाकरे यांनी गावात संपर्क करून माजी उपसरपंच राजेंद्र जतनसिंग गिरासे यांनी वरिष्ठांशी तातडीने संपर्क साधला असता धुळे जिल्हा पशुसंवर्धन सभापती संग्राम पाटील यांनी तातडीने वरिष्ठांशी संपर्क साधून उपाय योजना राबविली शिंदखेडा येथील डॉ. आर एम शिंदे,डॉ. बी टी देसले डॉ. भदाणे डॉ. सुरेश राज भोज,डॉ. सीमा शिंदे डॉ. ज्ञानेश्वर कुवर गणेश वाल्हे आधी डॉक्टरांच्या टीमने दुपारपर्यंत 90 पेक्षा जास्त गुरांवर तातडीने उपचार चालू ठेवले तसेच जिल्हा उपयुक्त विसावे यांनी धुळे येथील चार पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक पाठविले यासाठी गावातील जगन्नाथ कोळी, जयपाल युवराज गिरासे, महिपाल गिरासे, प्रशांत गिरासे, आदी मंडळींनी दिवसभर धावपळ करून आलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह आता त्यांना मदत केली अरुण काशिनाथ ठाकरे व दिनेश रोहिदास ठाकरे या मोलमजुरी करणारे दोघांचे 10 गुरे मृत्युमुखी पडल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्यामुळे त्यांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले होते.
