
बातमी कट्टा:- मुंबई -आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन वरील सावळदे तापी नदीपात्रात एकाने उडी घेतल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून पुलावर मोटरसायकल, मोबाईल, बॅग व चप्पल मिळुन आली आहे.तापी नदीत शोध कार्य सुरु आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार आज दि 30 रोजी दुपारच्या सुमारास मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील सावळदे तापी नदीपुलावर एम.एच 12 आर एच 8978 क्रमांकाची हिरो स्पेलंडर प्लस मोटरसायकल बेवारस उभी असून मोटरसायकली जवळ मोबाईल बॅग व चप्पल मिळुन आली आहे.मोटरसायकल वरील व्यक्तीने तापी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी बघणाऱ्यांनी सांगितले आहे.घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली असून उशीरापर्यंत शोध कार्य सुरु होता.
