
बातमी कट्टा:- महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची घटना आज दि 31 रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे.घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून महिलेचा खून करुन जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रथमदर्शनी दिसून आले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर तालुक्यातील करवंद ते नटवाडे गावादरम्यान नटवाडे गावाच्या एक किमी अंतरावर महिलेचा अर्धवट जळालेल्या स्थितीत मृतदेह मिळुन आला आहे.घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने ,पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, पोलीस उपनिरीक्षक किरण बार्हे यांच्यासह पथक घटनास्थळी पोहचले आहे.

पोलीसांना रस्त्याच्याकडेला घटनास्थळी महिलेचा अधर्वट स्थितीत मृतदेह मिळुन आला यावेळी सदर घटना आज पहाटेची असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.तर घटनास्थळी दगडाला रक्त लागलेले आढळून आले आहे. प्रथमदर्शनी महिलेचा खून करून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा संशय पोलीसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
घटनास्थळी करवंद व नटवाडे येथील नागरिकांनी गर्दी केली आहे.सदर महिला कोण याबाबत पोलीसांकडून शोध सुरु असून जवळपास असलेले सी.सी.टी.व्ही फुटेजचा तपासणी करण्यात येत आहे.
