सावकाराकडे तिसऱ्या दिवशी तब्बल दहा कोटींचे घबाड

बातमी कट्टा:- धुळे शहरातील सावकार राजेंद्र बंब यांच्याकडे तिसर्या दिवशीही मोठे घबाड सापडले आहे. पोलीसांनी त्यांच्या शिरपूर पिपल्स बँकच्या लॉकरमधून तब्बल 5 कोटी 13 लाख 44 हजार 530 रुपयांची रोकड, दहा किलो सोने तर 7 किलो 651 ग्रँम चांदी व विदेशी चलनातील नोटा पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

व्हिडीओ बातमी

धुळे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध सावकारी करणाऱ्या राजेंद्र बंब यांना अटक केली होती.त्यांच्या ताब्यातून रोजच मोठ मोठे घबाड उघड होत आहे. त्यांच्या तिन बँकेतील लॉकर पैकी जळगाव जनता बँक येथील लॉकर 2 कोटी 56 लाखांची रोकड व 19 लाखांचे सोने पोलीसांनी जप्त केले होते.तर काल दि 4 रोजी पोलीसांनी तिसऱ्या दिवसाच्या कारवाईत राजेंद्र बंब यांच्या शिरपूर पिपल्स बँक मधील लॉकर मधून 5 कोटी 13 लाख 44 हजार 530 रूपये रोकड सापडली असुन ,5 कोटी 54 लाख किंमतीचे 10 किलो 563 ग्रँम तर 5 लाख 14 हजार 911 रूपयांचे 7 किलो 621 ग्रँम चांदी पोलीसांनी जप्त केले आहेत.यात सोन्याचे 67 बिस्कीट असल्याचे उघड झाले आहे.तिसऱ्या दिवशी 10 कोटी 73 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या तिन दिवशात राजेंद्र बंब यांच्या ताब्यातून 9 कोटी 10 लाखांची रोकड व सहा कोटी 25 लाखांचे दागिने जप्त केले आहेत. पोलीसांंनी काही मालमत्तेचे कागदपत्रे देखील ताब्यात घतले आहे.

व्हिडीओ बातमी

चार दिवसांपासून राजेंद्र बंब यांचे रोजच मोठ मोठे घबाड उघड होत असल्याने सर्वजण चक्रावले आहेत.लॉकरची तपासणी केली असता त्यामध्ये अक्षरशः नोटा कोंबलेल्या सापडल्याचे सांगण्यात आले आहे.राजेंद्र बंब यांची राष्ट्रीयीकृत बँक मधील खात्यांची देखील तपासणी करण्यात येणार आहे.

व्हिडीओ बातमी
WhatsApp
Follow by Email
error: