बातमी कट्टा:- शिरपूर तालुक्यातील बोरगांव येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीची 2022-27 या कालावधी साठीची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक उपसरपंच तथा सरपंच महासंघ तालुकाध्यक्ष योगेंद्रसिंग सिसोदिया यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध झाली.

संपूर्ण महाराष्ट्रात सहकारी सोसायटी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम राबविण्यात येत आहे. शिरपूर तालुक्यात पण बऱ्याच गावांचा निवडणूक कार्यक्रम टप्या टप्याने राबविला जात आहे. तालुक्यातील काही गावात वि का सोसायटीच्या निवडणूका अत्यंत चूरशिच्या झाल्यात तर काही गावातील निवडणुका सत्ताधारी व विरोधकांनी मिळून सामंजस्याने बिनविरोध करून घेतल्या.
बोरगांव वि. का. सोसायटी निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी सर्वसाधारण कर्जदार मतदार संघातून 8, राखीव मतदार संघातून 3 व महिला मतदार संघातून 2 अशा एकूण 13 जागांसाठी फक्त 13 उमेदवारी अर्ज दाखल झाल्यामुळे वि. का. सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाली.

बिनविरोध निवड झालेले संचालक मंडळ असे – सर्वसाधारण कर्जदार मतदार संघातून दगेसिंग मोहनसिंग राजपूत, रघुनाथ झुलाल कोळी, हिरालाल चिंधा पाटील, पदमसिंग बहादूर राजपूत, लोटन शंकर धनगर, भटेसिंग पोलदसिंग राजपूत, खंडू झिंगा राजपूत, रजेसिंग भुता राजपूत तर राखीव मतदार संघातून गोकुळ चिंधा येशी, हरी उत्तम भिल, योगेंद्रसिंग दाजभाऊ सिसोदिया व महिला मतदार संघातून विमलबाई सुजानसिंग राजपूत आणि मंगला जगतसिंग राजपूत यांची बिनविरोध संचालक पदी निवड झाली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बी डी पाटील, सोसायटी सचिव नरेंद्रसिंग दुर्योधन गिरासे यांनी कामकाज पाहिले.निवडणूक बिनविरोध करण्यासाठी माजी सरपंच नारायण लकडू राजपूत, विठ्ठल झुलाल कोळी, रजेसिंग मोहनसिंग राजपूत, बी डी सिसोदिया सर, देवेसिंग ओंकारसिंग राजपूत, सुभाष बारकू न्हावी, जयराम पोपट पाटील, कौतिक तोताराम न्हावी, रविंद्र पांडुरंग पाटील, दीपक राजपूत, धनसिंग राजपूत, रोहिदास उत्तम कोळी, नानेसिंग राजपूत, गुलाब फुला भिल, तानकु उखडू भिल, दशरथ गंगाराम भिल व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.
बिनविरोध निवड झाल्याबद्दल माजी मंत्री अमरीशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा, सूतगिरणी चेअरमन भूपेशभाई पटेल, जि प अध्यक्ष डॉ तुषार रंधे, मा नगराध्यक्ष प्रभाकर चव्हाण, मा नगरसेवक अशोक कलाल, जि. प. सदस्या अभिलाषा भरत पाटील, पं. स. सदस्या विठाबाई निंबा पाटील, मा पं. स. उपसभापती जगतसिंग राजपूत, कल्याण ठाणे येथील बोरगांवकर बिल्डर चे मालक संजय धोंडू बोरगांवकर आदींनी नवनिर्वाचित संचालकांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.