तुफान हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल…

बातमी कट्टा:- वाळु ठिय्यावर तुफान हाणामीरचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.या व्हिडीओत मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर उभे असल्याचे दिसत आहेत.काही ट्रॅक्टरांमध्ये वाळू दिसत आहे.या वादाचे नेमके करण समजू शकलेले नाही. मात्र शिरपूर शहर पोलीस स्टेशनात उप्परपींड येथील वाळू ठिय्यावर एकाचे वाद झाल्याची तक्रार नोंद करण्यात आली आहे.

व्हिडीओ व सविस्तर

काल सकाळपासून शिरपूर तालुक्यातील सोशल मिडीयावर तुफान हाणामारी होत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत जवळच मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर असल्याचे दिसून येत आहेत तर सदर घटना उप्परपींड गावाजवळील असल्याचे व्हिडीओत दिसून येत आहे. मजूरांमध्ये वाद होत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. तर काल सकाळी शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे एक तक्रार दाखल करण्यात आली आहे.

व्हिडीओ

तक्रारीत म्हटले की दि 04 रोजी सकाळी 07.30 उपरपिंड ता.शिरपूर येथील वाळु ठिया येथे निलेश रवींद्र कोळी वय 20 धंदा मजुरी रा.वनावल याला काही एक कारण नसतांना मारहाण करुन शिवीगाळ तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दाखल आहे.उप्परपींड वाळु ठिय्यावर काम करणारे कामगार देखील शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे दाखल झाले होते.त्यानंतर पोलीसांचा मोठ्याप्रमाणात फौजफाटा उप्परपींड येथील वाळु ठिय्यावर दाखल झाला होता.मात्र या घटनेबाबत पोलीसानात अद्याप कुठलाही गुन्हा दाखल नाही.सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेला सदरचा व्हिडीओ हा देखील उप्परपींड वाळु ठिय्या येथील असल्याचे सोशल मिडिया सांगण्यात येत आहे.

व्हिडीओ
WhatsApp
Follow by Email
error: