पहाटेच्या वेळी पाठलागाचा थरार ! पोलीसांनी सिनेस्टाईल पाठलाग करुन “ती” कार घेतली ताब्यात

बातमी कट्टा:- पहाटेच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्ग भरधाव येणाऱ्या ईरटीका कारवर पोलीसांना संशय आल्याने पोलीसांनी त्या ईरटीका कारला थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र पोलीसांना बघून संशयितांनी आणखी भरधाव वाहन पळवले. पोलीसांनी सिनेस्टाईल पाठलाग करुन अखेर कारला थांबवले.तपासणी केली असता कारमध्ये सात लाख किंमतीची अफू आढळून आली आहे.

आज दि 8 रोजी पहाटेच्या सुमारास मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर एम.एच 18 बी.सी 0205 क्रमांकाची ईरटीका कार भरधाव येत असल्याचे पोलीसांना दिसले.सोनगीर पोलीसांना संशय आल्याने पोलीसांनी ती ईरटीका कार थांबवण्याचा ईशारा दिला मात्र ते न थांबता भरधाव वेगाने सरवड – बोरीस रोडने महरगावकडे वाहन पळविले. पोलीसांकडून या कारचा पाठलाग सुरु होता.संशयित रित्या जाणाऱ्या कारचा नियंत्रण सुटल्याने कावठी शिवारात किरकोळ अपघात झाला यावेळी घटनास्थळी पोलीस दाखल होते.पोलीसांनी त्या कारची तपासणी केली असता त्यात 144.48 किलो ग्रँम वजनाचा सात लाख 22 हजार 400 रूपये किंमतीचा अफू आढळून आला.पोलीसांनी 7 लाखांच्या अफूसह सहा लाख किंमतीची कार, दोन हजार किंमतीचे मोबाईल जप्त करत महेंद्र फौजेसिंग रिजपुरोहित रा.पंचपज्ञा जि.बाडमल राजस्थान याच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

WhatsApp
Follow by Email
error: