दोंडाईचा येथे भव्य मेंदू व मनक्यांचे विकार तपासणी शिबिर !! गरजूंना लाभ घेण्याचे आवाहन

बातमी कट्टा:- दोंडाईचा येथे दि 12 रोजी रोटरी क्लब ऑफ दोंडाईचा सिनियर्स व श्री सिद्धेश्वर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मेंदू व मनक्यांचे विकार तपासणी शिबिर सकाळी १० ते २ या वेळात दोंडाईचा शहरातील रोटरी आय हॉस्पिटल,रोटरी मार्ग येथे आयोजित करण्यात आले आहे.या शिबिरात सुप्रसिद्ध न्युरो सर्जन डॉ अभिजित चंदनखेडे तपासणी करणार असुन रुग्णांची मेंदू व मनक्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणी करुन गरजु रुग्णांची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया,अपघातानंतर तातडीच्या शस्त्रक्रिया, मेंदुच्या गाठी ( ब्रेन ट्युमर) व कर्करोगाचे निदान त्यावरील शस्त्रक्रिया तसेच लहान मुलांमधील मेंदु विकारांची तपासणी व निदान करण्यात येणार आहे.

शिबिरातील गरजु रुग्णांवर श्री सिद्धेश्वर मल्टीस्पेशालिटी हाँस्पिटल धुळे येथे एम.आर.आय.व सर्व तपासण्यांवर ५०% सवलत देण्यात येणार असून शिबिरातील गरजु रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी श्री सिद्धेश्वर मल्टीस्पेशालिटी हाँस्पिटल धुळे येथे सर्व शासकीय योजनेअंतर्गत तसेच विविध कॅशलेस सुविधांमधुन उपचार केले जातील तरी गरजु रुग्णांनी याचा लाभ घ्यावा तसेच रुग्णांनी नाव नोंदणीसाठी 8888873813 व 9834468021 या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन रोटरी सिनियर्सचे अध्यक्ष राजेश माखीजा सचिव नितीन अयाचीत,प्रो चेअरमन डॉ राजेंद्र पाटील, को.प्रो.चेअरमन प्रविण महाजन, रोटरी आय हॉस्पिटलचे चेअरमन राजेश मुणोत ,सिद्धेश्वर हॉस्पिटलचे संचालक डॉ जितेंद्र ठाकुर ,डॉ संजय संघवी ,डॉ नैनैश देसले आदींनी केले आहे .

WhatsApp
Follow by Email
error: