
बातमी कट्टा:- आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सदगुरू जग्गी वासुदेव यांनी मातीचा होणारा ऱ्हास लक्षात घेता त्याच्या संवर्धनासाठी जागरुकता निर्माण करण्यासाठी ‘माती वाचवा’ नावाची जागतिक मोहीम सुरू केली आहे. गेल्या काही महिन्यांत माती वाचवा चळवळीला जगभरातील लोकांकडून व्यापक प्रतिसाद मिळाला आहे.‘माती वाचवा’ या मोहिमे अंतर्गत श्री. सद्गुरु यांनी 100 दिवसात 27 देशांना भेटी दिल्या आहेत. ही त्यांची ‘सोलो बाईक राईड’ आहे. 26 देशांना भेट देऊन त्यांचे नुकतेच मायदेशी जामनगर गुजरात येथे आगमन झाले.

भारतातील विविध राज्यांत भेट दिल्यानंतर, सद्गुरू महाराष्ट्र राज्यात शनिवार ११ जून रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावरून मोटरसायकलवर नाशिक येथे जात आहेत. यावेळी इच्छुक भाविक व जनतेजवळ, सद्गुरूंच्या ह्या सर्व समावेशी माती वाचवा अभियानाला पाठींबा दर्शवण्यासाठी शनिवारी सकाळी ८ ते ९ वाजेच्या दरम्यान शिरपूर तालुक्यातील सावळदे येथील हॉटेल श्री राजलक्ष्मी येथे संघटित होण्याची संधी आहे.
सदगुरुंचे हे अभियान जागतिक अन्न संघटना आणि युनायटेड नेशन्स कन्झर्व्हेशन टू कॉम्बॅट डेजर्टीफिकेशन यांच्या माध्यमातून आहे.भारतातच नव्हे तर जगभरात शेतकरी आत्महत्या करत असल्याचं सद्गुरू म्हणाले. या अभियानाच्या माध्यमातून वाढत्या वाळवंटीकरणावर जागरुकता आणि मातीचा होणारा ऱ्हास थांबवण्याचे प्रयत्न केले जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं.
यूएनसीसीडी म्हणजे युनायटेड नेशन्स कन्झर्व्हेशन टू कॉम्बॅट डेजर्टीफिकेशन (UNCCD) ने त्यांच्या एका अहवालात सांगितलं आहे की, 2050 सालापर्यंत जगभरातील 90 टक्के मातीचा ऱ्हास होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम हा अन्न सुरक्षा, पाण्याचा तुटवडा, दुष्काळ, वातावरणातील बदल, स्थलांतर यावर होणार आहे. माती वाचवा अभियानाचा उद्देश हा जगभरातील किमान साडेतीन अब्ज किंवा 60 टक्के लोकांमध्ये मातीच्या संवर्धनाविषयी जागरुकता निर्माण करणे हा आहे. जागतिक पर्यावरण संरक्षण विषयी जनजागृति करणे हा या ‘माती वाचवा’ मोहिमेचा मुख्य उद्देश्य आहे.
अभियानाला पाठींबा देण्यासाठी आणि अजून माहितीसाठी वाचा : https://www.consciousplanet.org/mr