सोयाबीन चोरीचे रॅकेट उघड, 4 लाखांचा मुद्देमाल जप्त…

बातमी कट्टा:- काही दिवसांपासून चोरींचे प्रमाणात वाढ झाली होती. गोडाऊन मधील सोयाबीन व भगर चोरी झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनात दाखल होती.पोलीसांनी चोरीचे रॅकेट उघड करत 4 लाख 25 हजार किंमतीचा सोयाबीन व भगर पोलीसांनी जप्त केला असून चार संशयितांना ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांच्यासह पथकाने सखोल तपास करुन चार संशयितांना ताब्यात घेत गुन्हा उघडकीस आणत संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे विजय देवीदास पेंढारकर रा.माळी गल्ली पिपळनेर यांनी तक्रार दाखल केली होती.तक्रारीत म्हटले की विजय पेंढारकर यांचा धान्य खरेदी विक्रीचा व्यवसाय असून त्यांचे भाईंदर गावाच्या शिवारात धान्य ठेवण्याचे पत्र्याचे शेड असलेले गोडाऊन आहे .सदर गोडाऊन मध्ये उघड्यावर असलेला एकुण 1 लाख 32 हजार किंमतीचा 27 क्विंटल सोयाबीन व व तीस हजार किंमतीचा 5 क्विंटल भगर चोरी झाल्याची तक्रार दाखल केली होती.

त्या तक्रारीसह अशा पध्दतीने घडणाऱ्या गुन्ह्यांचा तपास पिंपळनेर पोलीस स्टेशनचे सा. पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांच्यासह पोलीस पथक करत होते.यावेळी पोलीसांना गोपणीय माहिती प्राप्त झाल्यानंतर रंजित योहान देसाई रा बोढरीपाडा ता.साक्री याला पोलीसांनी ताब्यात घेतले व सखोल चौकशी केली असता.संशयित रंजित देसाई याने गुन्ह्याची कबूली देत त्याचे साथीदार रुवाजी गेंदा गावीत वय 45 वर्ष रा.बोढरीपाढा ,किरण ईश्वर वळवी वय 23 वर्ष रा.वार्सा ता.साक्री, दावित वन्या राऊत वय 24 वर्ष रा.नांदरखी ता.साक्री अशांनी मिळुन चोरी केली असल्याची कबुली दिली असता पोलीसांनी चारही संशयितांना ताब्यात घेत बाजारात विकलेला एकुण 65 क्विंटल सोयाबीन व 5 भगर असा एकुण 4 लाख 20 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कामगिरी पिंपळनेर पोलीस स्टेशनचे सा. पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे,प्रविण अमृतकर,प्रकाश सोनवणे, मनोज शिरसाठ,राकेश बोरसे ,भुषण वाघ आदींनी कारवाई केली आहे.

WhatsApp
Follow by Email
error: