
बातमी कट्टा:- संपूर्ण राज्यात सुरु असलेल्या बंडखोरीच्या राजकारणानंतर शिवसेनेचे धुळे महानगरप्रमुख सतीश महाले यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

शिवसेनेचे आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर मंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ सतीश महाले यांनी राजीनामा दिला आहे.एकनाथ शिंदे यांनी संकट काळात मदत केल्याने त्यांच्या सोबत जात असल्याचं सतीश महाले यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे. गेल्या तीन दिवसांपासून धुळे शहरात सतिष महाले विरुद्ध शिवसेना असे चित्र पाहायला मिळत आहे.सतिष महाले यांनी शहरात लावलेले एकनाथ शिंदे समर्थक बॅनर हे शिवसैनिकांनी फाडले होते, तर काही बॅनर पोलिसांनी काढून घेतले होते.आता सतिश महाले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना त्यांनी राजीनामा पाठवला असून, तो स्वीकारावा अशी विनंती करण्यात आली आहे.
