बातमी कट्टा : पंचायत राज प्रशिक्षण केंद्र खिरोदा अंतर्गत राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियाना तर्फे तालुक्यातील ग्राम पंचायत सरपंच/उपसरपंच/सदस्यांनी बोराडी गावाला भेट दिली.
धुळे जिल्ह्यात ग्राम पंचायत स्थरावर विकासाचे बोराडी पॅटर्न म्हणून उदयास येणाऱ्या बोराडी गावात माझी वसुंधरा अभियान यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. येथील रस्ते, गार्डन, मंदिर, वृक्षारोपण, अमरधाम, आदिवासी पावरा समाजाचे आराध्यदैवत देवमोगरा मंदिर, पंचतारांकित हॉटेलात ही नसतील असे शौचालय ज्यात पंखे, आरसा, स्टाईल बेसिन ई सुख सुविधा देण्यात आल्या आहेत, अशा पंचायतीची भेट प्रशिक्षणाअंतर्गत ग्रा पं सदस्य सरपंचांना करून दयावी अशी विनंती सरपंच महासंघ तालुकाध्यक्ष तथा बोरगांव चे उपसरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया यांनी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी एस टी सोनवणे व पंचायतराज प्रशिक्षण केंद्राचे प्रा अतुल महाजन यांच्या कडे केली असता त्यांनी ती मागणी मान्य केली म्हणून बोराडी गावातील विकास कामे व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत विविध कामांची पाहणी करण्यासाठी सरपंच/उपसरपंच/सदस्यांनी बोराडी गावाला भेट दिली.
पंचायत समिती शिरपूर तर्फे तालुक्यातील प्रत्येक ग्राम पंचायतींचे प्रशिक्षण कार्यक्रम टप्या टप्याने चालू आहेत. पहिल्या टप्यात 14 ग्राम पंचायतींना प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणाअंतर्गत आज तालुक्यातील ग्राम पंचायत प्रतिनिधिंनी बोराडी गावाला भेट दिली यावेळी बोराडी गावाचे विकासनायक उपसरपंच श्री राहुलआबा रंधे यांनी बोराडी गावातील विविध विकास कामांची माहिती प्रत्यक्ष घटनास्थळी नेऊन दिली. शिरपूर तालुक्याचे भाग्यविधाते माजी मंत्री श्री अमरीशभाई पटेल, जि प अध्यक्ष डॉ तुषारभाऊ रंधे, आमदार श्री काशिरामदादा पावरा यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळत असल्यामुळे बोराडी गावाची विकासाकडे घोडदौड चालू असल्याचे उपसरपंच श्री राहुलआबा रंधे यांनी उपस्थितांना सांगितले.
भेटी दरम्यान काय झाडी, काय चोपाटी, काय गार्डन, काय शौचालय, काय रस्ते, काय लाईट…. ‘ओके मध्ये हाय बोराडी’ अशा प्रतिक्रिया ग्राम पंचायत प्रतिनिधिंनी दिल्या.
या भेटीचा समारोप ग्राम पंचायत कार्यालय बोराडी येथे करण्यात आला यावेळी बोरगांव उपसरपंच तथा सरपंच महासंघ तालुकाध्यक्ष योगेंद्रसिंग सिसोदिया यांनी बोराडी ग्रा पं उपसरपंच श्री राहुलआबा रंधे व ग्रामसेवक श्री डी आर पेंढारकर यांचे आभार मानले.
बोराडी ग्राम पंचायती भेटीला विखरण सरपंच मिना मनोज पाटील, बोरगांव उपसरपंच तथा शिरपूर तालुका सरपंच सेवा महासंग अध्यक्ष योगेंद्रसिंग सिसोदिया, जामन्यापाडा सरपंच सरदार पावरा, चाकडू सरपंच सुनिल मुखडे, उपसरपंच तुकाराम पावरा, गरताड मा सरपंच राकेश सोनवणे, सदस्य आर के कोळी, युवराज मोरे, भोरखेडा ग्रा पं सदस्य ताराचंद मोरे, शिंगावे ग्रा पं सदस्य रविंद्र पाटील, विखरण ग्राम पंचायत सदस्या निता गणेश पाटील, रुपाली कवरदास पाटील, पंचायत समिती विस्तार अधिकारी आर जी पावरा, एस एस पवार यांची उपस्थिती होती.