अन् महिलेच्या आक्रोशाने तोतया पोलीसांनी काढला पळ,पाच संशयित ताब्यात…

बातमी कट्टा:- सीबीआय पोलीस असल्याचा बनाव करून घरातील दागिन्यांची लुट करणाऱ्या धुळे येथील पाच संशयितांना पोलीसांनी ताब्यात घेतले असून दोन संशयित फरार झाले आहेत.त्यांच्या ताब्यातून 80 हजार किंमतीचे चांदिचे दागिने जप्त करण्यात आले आहे.

व्हिडीओ बातमी

मिळालेल्या माहिती नुसार शिरपूर तालुक्यातील उमर्दा गावातील खारेपाडा येथे घटना घडली आहे.खारेपाडा येथील दादल्या गुजाऱ्या पावरा हे नेहमी प्रमाणे दिनांक ११ जुलै रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास किराणा दुकान बंद करून वरच्या मजल्यावर जेवन करुन झोपण्याच्या तयारी करीत होते.यादरम्यान घरात अचानक ६ अज्ञात इसम आले व त्यापैकी एकाने कुठलेतरी कार्ड दाखवुन आम्ही नाशिक येथील सीबीआय पोलीस असल्याचे सांगत तुम्ही बोगस खत, बियाणे विक्री करत असल्याची माहीती मिळाली असुन आम्हाला घराची झडती घ्यावायाची आहे सांगुन घराची झडती घेतली.मात्र घरात काही एक मिळाले नाही. तुमच्यावर आम्ही पोलीस केस करु नाहीतर तुम्हाला पैसे द्यावे लागतील सांगितले. त्यानंतर त्यांनी पावरा यांची बळजबरीने शर्टची कॉलर पकडुन घरा शेजारी लावलेल्या पांढऱ्या रंगाच्या चार चाकी वाहनाकडे घेवून गेले. तेव्हा पावरा यांच्या पत्नी लता हिने त्या इसमांची विनवणी करून पत्नीने त्यांना घरात असलेले चांदीचे दागिने आणुन त्यांना दिले.त्यांनी ते दागिणे ठेवून घेतले. तरी देखील त्यांनी सोडले नाही. उलट त्यांनी आणखी पैशांची मागणी करुन गाडीत मागच्या बाजुला बसवुन गाडीचा दरवाजा बंद करुन घेतला.आणि गाडी चालु करुन पुढे घेवुन गेले व शांत न बसल्यास मारहाण करण्याची धमकी दिली. त्यामुळे पत्नी आरडाओरड करुन गाडी सामोर उभी राहीली. तेव्हा शेजारी राहणारा लहान भाऊ बाबुलाल गुजाऱ्या पावरा व गावातील लोक जमा होवु लागले. सदर कार्ड दाखविणारा इसम व गाडीतील ड्रायव्हर हे गाडीत बसलेले होते. व इतर तीन इसम हे गाडीच्या बाहेर उभे होते. तेव्हा अर्जुन चिमा पावरा यांनी सदर इसमांपैकी कार्ड दाखविणाऱ्या इसमास विचारले की, तुम्ही पोलीस आहात तर तुमचे ओळखपत्र दाखवा. तेव्हा त्या इसमाने कार्ड दाखविले. तेव्हा ते कार्ड प्रहार प्रेसचे असल्याचे दिसले. तेव्हाच बाबुलाल गुजाऱ्या पावरा यांनी गाडीचा मागचा दरवाजा उघडुन त्यांना बाहेर काढले.आणि जमलेल्या लोकांनी त्यांना विचारपुस करु लागल्याने गाडीत बसलेले दोन्ही इसम हे गाडी घेवून पळून गेले व उर्वरीत संशयित रस्त्याने पळत सुटले. पाठलाग केला मात्र अंधाराचा फायदा घेत ते फरार झाले.घटनेची माहिती शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे सा.पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांना मिळाल्यानंतर पोलीसांनी नाकाबंदी करुन पाच इसमांना पकडले.सदर घटनेसंदर्भात सकाळी १० वाजेच्या सुमारास पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी आले तेव्हा पोलीसांनी पकडलेल्या संशयित विजय रमेश देवरे, साहील कबीर शेख, राहुल दयाभाई पटेल,गोटीराम गिणा पावरा, मिलींद बन्सीलाल शेजवळ यांना फिर्यादीने ओळखले. यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.या घटनेत ८० हजार रुपये किंमतीच्या चांदीचे हातातील ६० भार वजनाच्या ८ ( चार जोड) वेल्या पोलीसांनी जप्त केल्या आहेत. या प्रकरणी विजय रमेश देवरे,साहील कबीर शेख, राहुल दयाभाई पटेल,गोटीराम गिणा पावरा,मिलींद बन्सीलाल शेजवळ तसेच कार्ड दाखविणारा नितीन पुंडलिक मुकुंदे व गाडीचा चालक (नाव माहित नाही ) सर्व राहणार धुळे यांनी संगणमत करुन पोलीस असल्याची सांगुन घरात प्रवेश केला. तसेच बोगस बी-बियाणे विक्रि करत असल्याचे सांगुन दमदाटी तसेच मारहाण करण्याची धमकी दिली.८० हजाराचे चांदीचे दांगीने घेवून गेले.म्हणून त्यांच्या विरोधात शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हिडीओ बातमी
WhatsApp
Follow by Email
error: