बातमी कट्टा:- मध्यप्रदेश राज्यातील धार जिल्ह्यातील धामनोद येथील खलघाट जवळील नर्मदा नदी पुलावर प्रवासी वाहतूक करणारी एसटी बस नर्मदा नदी पुलावरुन नदीपात्रात पडल्याची घटना घडली आहे. सदर बस महाराष्ट्र डेपोची असून सकाळी 9:45 वाजेच्या सुमारास अपघात घडला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार आज दि 18 रोजी सकाळी 9:45 वाजेच्या सुमारास मध्यप्रदेश राज्यातील धार जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे.धमनोद येथील खलघाट जवळील मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील नर्मदा नदी पुलावर महाराष्ट्र राज्यातील एम.एच 40 9848 क्रमांकाची अमळनेर आगाराची इंदौर पुणे एसटी बस ओव्हरटेक करत असतांंना नियंत्रण सुटल्याने बस पुलावरुन नर्मदा नदीत कोसळली यात आतापर्यंत 13 जणांचा मृतदेह मिळून आले असून रेस्क्यू टिम कडून बचावकार्य सुरु आहे.क्रेनच्या साह्याने कोसळलेली बस बाहेर काढण्यात आली आहे.तर 15 प्रवाशांना वाचवण्यात यश प्राप्त झाले आहे.काही प्रवाशी बेपत्ता आहेत.या बसमध्ये शिरपूर तालुक्यातील देखील प्रवासी असल्याचे सांगितले जात आहे. घटनास्थळी शिरपूर येथील प्रांताधिकारी प्रमोद भामरे सह शिरपूर प्रशासन देखील रवाना झाले आहेत.