पंचायत समिती कंत्राटी इंजिनिअरची आत्महत्या…

बातमी कट्टा:- पंचायत समितीच्या कंत्राटी इंजिनिअरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्वताच्या मोटारसायकलवर उभे राहून निंबाच्या झाडाला नायलॉन दोरी बांधून गळफास घेतले.

अमळनेर शहरालगत गलवाडे रस्त्याकडील साने गुरुजी स्मारकाजवळ स्वताच्या मोटरसायकलवर उभे राहून निंबाच्या झाडाला नायलॉन दोरीच्या सहाय्याने पंचायत समितीच्या कंत्राटी इंजिनिअर प्रशांत एकनाथ देसले वय 48 रा.झोडगे ता.मालेगाव यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली.

प्रशांत देसले हे अमळनेर पंचायत समितीच्या सर्व शिक्षा अभियानात कंत्राटी अभियंता म्हणून कार्यरत होते.घटनेची माहिती प्राप्त होताच घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल होत प्रशांत देसले यांचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात दाखल केला.याबाबत मारवड पोलीस स्टेशनात नोंद करण्यात आली आहे.

WhatsApp
Follow by Email
error: