तिहेरी अपघात,भीषण अपघातात तिघांचा मृत्यू …

बातमी कट्टा:- भरधाव ट्रक ट्रॅक्टर आणि मोटरसायकलीचा तिहेरी अपघात झाल्याची घटना आज दि 23 रोजी रात्री घडली हा अपघात ईतका भीषण होता की या अपघातात मोटरसायकलीचा चक्काचूर झाला तर ट्रॅक्टरचे दोन तुकडे झाले.यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार धुळे दोंडाईचा रस्त्यावरील पेडकाई ते मेथी गावादरम्यान भीषण अपघात झाल्याची घटना आज दि 23 रोजी सायंकाळच्या सुमारास घडली आहे.धुळ्याकडून येणाऱ्या भरधाव ट्रक, ट्रॅक्टर आणि मोटरसायकलीचा तिहेरी अपघात झाला. घटनेची माहिती प्राप्त होताच घटनास्थळी साळवे गावासह मेथी गावातील ग्रामस्थांनी धाव घेत मदत कार्य सुरु केले.हा अपघात ईतका भीषण होता की यात ट्रॅक्टरचे दोन तुकडे तर मोटरसायकलीचा अक्षरशः चक्काचूर झाला असून तीन जण ठार झाले आहेत.यात शिंदखेडा तालुक्यातील मेथी येथील आनंदसिंग भिमसिंग गिरासे वय 32,सखराम भिल तर दोंडाईचा शहरातील महादेवपुरा भागातील हर्षल ठाकूर या तरुणांचा जागिच मृत्यू झाला आहे.घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झाले असून रात्री उशिरापर्यंत कार्यवाही सुरु होती.

WhatsApp
Follow by Email
error: