भरधाव बसने महिलेला चिरडले, दाम्पत्य स्कुटीवर जात असतांना अपघात…

बातमी कट्टा:- सुरतेहून आपल्या गावाकडे कानुबाई मातेच्या उत्सवासाठी रोटच्या कार्यक्रमासाठी दाम्पत्य स्कुटीवर जात असताना एसटी बसने दिलेल्या धडकेत भीषण अपघात झाला.यात महिलेचा जागीच मृत्यू झाला तर पती जखमी आहेत.दि 26 रोजी सकाळच्या सुमारास घटना घडली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील शरद चुडामण पाटील व त्यांची पत्नी कल्पनाबाई शरद पाटील (वय ३३) दि.२६ जुलै मंगळवार रोजी गुजरातच्या चलथान येथुन स्कुटीने आपल्या गावाकडे कानुबाई मातेच्या उत्सवासाठी रोटच्या कार्यक्रमासाठी नवापूर मार्गे शिंदखेडाकडे निघाले असताना नवापूर शहरातील डी.जे.अग्रवाल स्कुलजवळ सकाळच्या सुमारास एम.एच.२० बीएलओ ३४३५ क्रमांकाच्या भरधाव वापी-धुळे या एसटी बसने त्यांच्या जी.जे.१९,एअर ८६४४ क्रमांकाच्या स्कुटीला मागुन जोराची धडक दिली.या अपघातात कल्पनाबाई शरद पाटील वय ३३,या.भडणे ता.शिंदखेडा खाली रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्यावरून बसचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.तर पती शरद चुडामण पाटील हे जखमी झाले.अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी नवापूर पोलिस स्टेशनचे पथकसह ग्रामस्थांनी मदतकार्यासाठी दाखल झाले.बसचालक बस सोडून पळून गेल्याने जोपर्यंत बसचालकाला माझ्या समोर आणत नाहीत तोपर्यंत मी माझ्या पत्नीच्या मृतदेहाला हात लावू देणार नाही असा आक्रोश पतीने पोलिसांसमोर केला.यावेळी घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती.

WhatsApp
Follow by Email
error: