पत्नीची आत्महत्या, नायब तहसीलदार पती विरुध्द गुन्हा दाखल…

बातमी कट्टा:- धुळे जिल्ह्यातील साक्रीत नायब तहसीलदार असलेल्या पती विरुद्ध पत्नीच्या आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पतीच्या जाचाला कंटाळून विवाहीतेने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

धुळे शहरातील देवपूर भागातील शिवनेरी कॉलनीत चित्रा गोपाळ पाटील वय 36 विवाहितीने दि 27 रोजी सकाळी 12 वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.याप्रकरणी मयत चित्रा पाटील यांचे वडील लोटन पांडुरंग थोरात रा.विट्टाभटी धुळे यांनी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

फिर्यादीत म्हटल्यानुसार दि 1 जून 2006 रोजी चित्राचा गोपाळ साहेबराव पाटील यांच्याशी विवाह झाला होता.त्यांना एक मुलगा व मुलगी असे दोन अपत्य असतांनाही गोपाळ पाटील हे चित्राच्या चारित्र्यावर संशय घेवून तिला मानसिक त्रास देवून फारकत मागत दमदाटी करत होते तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आल्याने गोपाळ पाटील विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले.गोपाळ पाटील हे साक्री येथे नायब तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत.

WhatsApp
Follow by Email
error: