ते सराईत दरोडेखोर निघाले इनामी चोर,फिल्मी स्टाईल” पाठलाग करुन दरोडेखोर शिरपूर पोलीसांच्या ताब्यात…

बातमी कट्टा:- दरोडा टाकण्याचा प्रयत्नात असणाऱ्या संशयितांना शिरपूर पोलीसांसह शोध पथकाने शिताफीने ताब्यात घेतले आहे. त्यांच्या ताब्यातून चोरीच्या तीन मोटरसायकलींसह तलवार आणि दरोड्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहेत.चौकशी दरम्यान सदर संशयितांवर मध्यप्रदेशातील पोलीसांनी संशयितावर बक्षीस जाहीर केले असून त्यांच्यावर मध्यप्रदेश राज्यात दरोडासह विविध कलमान्वये गुन्हे दाखल आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्यासह अधिकारी व शोध पथक दि 28 जुलै रोजी रात्री 1 ते 4 वाजेपावेतो ऑलआऊट निमित्त पेट्रोलींग करीत असतांना तीन मोटार सायकलीपैकी दोन मोटार सायकलीवर प्रत्येकी दोन इसम व एका मोटार सायकलवर एक इसम असे एका मागोमाग एक जोराने करवंद रोडने बालाजी नगरमध्ये जात असल्याचे दिसल्याने त्यांच्यावर पोलीसांना संशय आला. पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांनी सोबतचे अधिकारी व अंमलदार व शोधपथकासह पाठलाग केला. त्यांच्यातील एक मोटर सायकल चालक मोटरसायकल घसरून खाली पडला.ते पाहून दुसऱ्या दोन मोटर सायकलवर बसलेले चार संशयित मोटर सायकल सोडून पळू लागले.तेव्हा मोटर सायकलवरून घसरून खाली पडलेल्या संशयिताला तसेच पळून गेलेल्या चार संशयितांपैकी दोन संशयितांना पोलीसांनी शिताफीने पाठलाग करुन ताब्यात घेतले. पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या तीन संशयितांना विचारपूस केली असता त्यांचे नाव अत्तरसिंग मोहनसिंग भिल वय 26 ,सफु मोहनसिंग भिल वय 22 दोन्ही रा.नाहवेर ता.कुक्षी जि.धार व साहेब लोभु भिल वय 22 रा.गेटा ता.कुक्षी जि.धार मध्यप्रदेश व दोन इसम पळून गेले असून त्यातील एकाचे नाव रविंद्र मानसिंग भिल रा.नाव्हवेर ता.कुक्षी जि धार असे सांगितले.त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे तलवार,बॅग ,लोखंडी टयामी,मोठे कट्टर ,स्क्रु ड्रायव्हर,बॅक्टरी,स्पॅनर,मिर्ची पुड, तीन मोबाईल व तिन मोटरसायकली असा एक लाख 17 हजारांचा मुद्देमाल पोलीसांनी ताब्यात घेतला.

त्यांची अधिक चौकशी केली असता त्यातील दोन संशयितांवर मध्यप्रदेश येथील दोन पोलीस स्टेशन येथे इनामी चोर म्हणून जाहीर केले आहे. त्यांच्यावर मध्यप्रदेश राज्यातील कुक्षी,बाग,बडवाणी,राजपूर,पलसुद,पानसेमल येथील पोलीस स्टेशनात दरोड्यांसह चोरींचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक प्रविणकुमार पाटील,अपर अधिक्षक प्रशांत बच्छाव,पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख,सा.पोलीस निरीक्षक गणेश फड, उपनिरीक्षक किरण बार्हे,संदिप मुरकटे,प्रसाद रौंदळ,शोध पथकाचे ललित पाटील, लादुराम चौधरी,तुकाराम गवळी, प्रविण गोसावी,गोवींद कोळी,विनोद अखडमल,मुकेश पावरा, प्रशांत पवार (आर.सी.पी),सदाशिव पाटील, भाऊसाहेब मायचे,होमगार्ड नाना अहिरे आदींनी कारवाई केली आहे.

WhatsApp
Follow by Email
error: