बातमी कट्टा:- श्रावण मासानिमीत्त शिरपूर शहरासह परिसरातून विशाल शिव कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या कावडयात्रेत जास्तीत जास्त संख्येने धर्मप्रेमींनी सहभागी होण्याचे आवाहन शिरपूर शिवभक्त परिवारामार्फत करण्यात आले आहे.
श्रावण मासानिमीत्त दि 8 ऑगस्ट रोजी शिरपूर शहर व परिसरात विशाल शिव कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.कावड यात्रा सकाळी 7:30 वा कुरखळी तापी नदी येथून प्रस्थान होणार आहे.तर सायंकाळी 5 वाजता शहरातील बारी गल्लीत श्री पंचमुखी महादेव मंदीर येथे महाआरती होणार आहे.
कावड यात्रेचा मार्ग :- शिरपूर फाटा,आमोदे,बस स्टँड वरवाडे,मेन रोड,क्रांती नगर,जनता नगर,नारायण नगर,निमझरी नाका,गरबा ग्राऊंड,करवंद नाका,शरदचंद्र नगर,वाल्मिक नगर,अंबिका नगर,पाटील वाडा,तारण तरण मंदिर,बालाजी मंदीर,श्री पंचमुखी महादेव मंदीर बारी गल्ली येथे सायंकाळी 5 वाजता महाआरती होणार आहे.