स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त महामार्ग पोलीस केंद्रातर्फे हेल्मेट वाटप…

बातमी कट्टा:- भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने महामार्ग पोलीस केंद्र, शिरपूर यांचे वतीने हेलमेट वाटपाचा कार्यक्रम सकाळी ९ वाजता आयोजीत करण्यात आला होता यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तालुक्याचे आमदार काशीराम पावरा,हेमंतकुमार भामरे पोलीस निरीक्षक महामार्ग धुळे सुरेश शिरसाट सहाय्यक पोलीस निरीक्षक,उद्योजक अशोक अग्रवाल ,सनस्टर कंपनीचे मॅनेजर ललित मन्यार, सपोनी सारीका खैरनार ,पोसई नरेंद्र पवार,पोसई मुस्तफा मिर्झा, हे होते .


कार्यक्रमचे प्रास्ताविकता दरम्यान सपोई मिर्झा म्हणाले की महामार्ग पोलीस केंद्र मार्फत गेल्या आठ दिवसापासून आम्ही महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना वहान कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन करत आहोत गेल्या आठ दिवसांपूर्वी टोलनाक्याजवळ एका दुचाकी स्वाराचा अपघात झाला होता.अपघात पाहून मी माझी गाडी थांबवली व मदत कार्यासाठी इतर प्रवाशांना बोलवून सदर व्यक्तीस उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथे उपचारासाठी पाठवलं सदर दुचाकी चालकाचे हेल्मेट नसल्यामुळे त्याला डोक्यावर जब्बर मार लागला होता.तेव्हाच निश्चय केला होता आपण आपल्या महामार्ग पोलीस केंद्र मार्फत दुचाकी स्वारांना हेल्मेट वाटप करण्याचे ठरवले.आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त 50 दुचाकी स्वरांना हेल्मेट वाटप केले.
मार्गदर्शन करताना आमदार काशीराम पावरा म्हणाले की महामार्ग क्रमांक ३ मोठ्या प्रमाणात वर्दळ असते अनेक नागरिक मोटरसायकल चालविताना त्यांच्या डोक्यात हेल्मेट नसतं त्यामुळे अपघात झाल्यास डोक्याला इजा पोहचते महामार्ग वर अनेक तरुणांचा डोक्याला जबर मार लागल्याने त्यांच्या जागीच मृत्यू झाला आहे. उपस्थित तरुणांना विनंती आहे की प्रवास करताना हेल्मेटचा आवश्यक वापर करा जेणेकरून आपला प्रवास सुखाचा होईल घरातील कर्ता पुरुषाचा अपघात झाल्यास संपूर्ण कुटुंब उध्वस्त होतं तरुणांनी आपल्या कुटुंबाचा विचार केला पाहिजे आणि प्रवासात हेल्मेट वापर केला पाहिजे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव शिरपूर तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात साजरा करा राष्ट्रध्वजाचा अपमान होणार नाही याची कळजी घ्यावी.या कार्यक्रमात खास करून बाबूजी परिवार व सनस्टर कंपनीने हे हेल्मेट उपलब्ध करून दिले त्याचे देखील आभार मानले या कार्यक्रम यशस्वीसाठी
रमेश बारसे ,पोपट राठोड,तुळशिराम पाटील, सतिष जावरे,अमोल पाटील,देवेंद्र वेंदे,गोरख चौधरी, मुक्तार शहा,रविकुमार राठोड ,प्रविन अमृतकर ,संदिप रोकडे,सदिप माळी यांच्या महामार्ग पोलीसांनी परिश्रम घेतले होते.

WhatsApp
Follow by Email
error: