बातमी कट्टा:- स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव वर्षानिमित्त कार्यक्रमात एवढ्या पावसात आपण उभे आहात असे दृश्य कुठेही दिसत नाही.यामागे रंधे परिवाराचे श्रेय आहे.हे वर्ष अमृतमहोत्सव वर्ष आहे.स्वातंत्र्यासाठी कर्मवीर अण्णासाहेब व्यंकटराव रणधीर सारख्या स्वातंत्र्यसैनिकांनी लढा दिला म्हणून आपण आज आनंदाने स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहोत.हा कार्यक्रम खरोखर कौतुक करण्यासारखा आहे.आज कर्मवीर अण्णासाहेबांची आठवण येत आहे.असा कार्यक्रम पाहिला असता तर,खुप आनंद झाला असता.माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात अण्णांच्या हस्ते झाली होती.रंधे परिवाराचे शैक्षणिक,राजकीय,सामाजिक क्षेत्रातील कार्य कौतुकास्पद आहे.अण्णांनी तालुक्यात शाळा,काॅलेज काढले त्या काळात हे काम अतिशय कठीण होते.त्यावेळेस अण्णांनी शिक्षणाची गंगा तालुक्यात आणली म्हणून हजारो मुले डाॅक्टर, इंजिनिअर, शिक्षक झाले.आज तो वारसा रंधे परिवार चालवत आहे.जगात टिकायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही.म्हणून नव्या पिढीने शिक्षणाकडे लक्ष द्या असे आवाहन माजी शालेय शिक्षण मंत्री आ.अमरीशभाई पटेल यांनी केले.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व थोर स्वातंत्र्यसेनानी कर्मवीर अण्णासाहेब व्यंकटराव रणधीर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित किसान विद्या.प्रसारक संस्थेने दिनांक 15 ऑगस्ट 2022 रोजी ध्वजपुजन व वंदन तसेच भव्य झाकीचे आयोजन केले होते.सकाळी 10 वाजता डॉ.व्ही.व्ही.रंधे इंग्लिश मेडियम स्कूल शिरपूरच्या मैदानावरून शोभायात्रेला सुरुवात झाली कृतिकाबेन पटेल यांनी उद्घाटन केले.रॅली तेथून श्रीनगर कॉलनी,निमझरी नाका,पित्रेश्वर स्टॉप,नगरपालिका,पाटील वाडा,खालचे गाव बौद्ध वाडा,मांडळ रोड गुजराथी कॉम्प्लेक्स,विजय स्तंभ,न्यायालयावरून,एस.पी. डी.एम कॉलेज मार्गे,के.व्ही.टी.आर.सी.बी.एस.ई स्कूलला समारोप झाला.त्यानंतर सी.बी.एस.ई स्कूलमध्ये ध्वजपुजन व वंदनाचा कार्यक्रम झाला.
यावेळी मा.शालेय शिक्षण मंत्री आ.अमरीशभाई पटेल, मा.उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल,आ.काशीराम पावरा,धुळे जि.प.अध्यक्ष ना.डॉ.तुषार रंधे,जिल्हाधिकारी जलज शर्मा,पंतप्रधान आत्मनिर्भर अभियान संगठनचे जिल्हाध्यक्ष राहुल रंधे,प्रभाकर चव्हाण,शिरपूरच्या मा. नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल,प्रविणभाई दोशी,विवेक वैद्य,पंचायत समिती सभापती सत्तारसिंग पावरा,किसान विद्या.प्रसारक संस्थेचे सचिव निशांत रंधे,कोषाध्यक्षा आशाताई रंधे,आर.सी.पटेल संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी,उपविभागीय अधिकारी प्रमोद भामरे,डीवायएसपी दिनेश आहेर,तहसीलदार आबा महाजन,नायब तहसीलदार पेंढारकर,गटविकास अधिकारी एस.टी.सोनवणे,प्रकल्प अधिकारी सचिन शिंदे,पोलिस निरीक्षक रविंद्र देशमुख,जि.म.बँकेच्या संचालक सिमाताई रंधे,नगरसेवक रोहित रंधे,ग.स.बँकेचे संचालक शशांक रंधे,प्राचार्या सारीका रंधे,विद्या रंधे,हर्षाली रंधे,रोहिणी रंधे, सदस्य शामकांत पाटील,संजय गुजर,व्यवस्थापक के.डी.बच्छाव,भैय्या माळी,सिताराम माळी,प्रमोद भदाणे, इ.उपस्थित होते.धुळ्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनीही स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव वर्षानिमित्त मार्गदर्शन केले.
यावेळी के.व्ही.टी.आर.सी.बी.एस.सी स्कूल शिरपुर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर देखावा केला होता तर,
के.व्ही.टी.आर.सी.बी.एस.सी स्कूल शिरपूर- कर्म.स्व. व्यंकटरावजी रणधीर,श्रीमती सु.भ.कदमबांडे माध्यमिक विद्यालय,तोरखेडा -गड आला पण सिंह गेला
संत गाडगे महारांज माध्यमिक विद्यालय,थाळनेर-शिवराज्याभिषेक कर्मवीर डॉ.भा.पा.माध्यमिक विद्यालय, करवंद -पंढरीची वारी,सौ.सावित्रीताई व्यंकटराव रंधे कन्या विद्यालय,शिरपूर
-खान्देश दर्शन,
क्रां.शंकर पांडू माळी माध्यमिक विद्यालय,वरवाडे – शहिद भगतसिंग,राजगुरु,सुखदेव,
डॉ.पा.रा.घोगरे कनिष्ठ महाविद्यालय,शिरपूर – स्वातंत्र्य लढयात क्रांतिकारकारकांचे योगदान,
मातोश्री बनवाय कन्या माध्यमिक विद्यालय,बोराडी – स्वातंत्र्याचा प्रवास,
एम.ए.आझाद उर्दू माध्यमिक विद्यालय,शिरपूर – मिठाचा सत्याग्रह,
महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय,शिरपूर – महात्मा ज्योतिबा फुले जीवनदर्शन,
कवी कुसुमाग्रज माध्यमिक विद्यालय,अर्थे – संविधान दिनाचे सादरीकरण,
ब.ना.कुमार गुरुजी माध्यमिक विद्यालय,वाघाडी – स्व.शिरीष कुमार मेहता,
एस.पी.डी.एम महाविद्यालय,शिरपूर – स्वा.तंट्या भिल,
एम.ए.आझाद उर्दू माध्यमिक विद्यालय,शिरपूर – काकोरी कट,
सौ.कमलाबाई सखाराम बर्वे ज्युनियर कॉलेज,शिरपूर – भारतातील कर्तुत्ववान महिला
महात्मा फुले व डॉ आंबेडकर स्मृती विद्यालय,जातोडे – भारतीय संरक्षण दल
डॉ.व्ही.व्ही.रंधे सेकंडरी इंग्लिश मीडियम स्कूल,शिरपूर – जम्मु आणि काश्मीर,
कर्म.व्यंकटराव ता.रणधीर माध्यमिक विद्यालय,वाडी – कारगिल विजय दिवस,
मातोश्री रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालय,अर्थे – ऑपरेशन ब्ल्यु स्टार,
पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय,बोराडी – माझा खान्देश माझी संस्कृती,
डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्यापक विद्यालय,बोराडी – भारताची कृषी संस्कृती,कर्म.व्यंकटराव ता.रणधीर महाविद्यालय,बोराडी – आदिवासी होळी नृत्य, श्री.रा.रा.खंडेलवाल माध्यमिक विद्यालय,होळनांथे – वृक्षदिंडी,दादासो.व्ही.व्ही.रंधे फार्मसी कॉलेज,बोराडी – आधुनिक भारत,डॉ.व्ही.व्ही रंधे प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूल,शिरपूर – ओडिसा संस्कृती दर्शन,श्रीमती द.ता.पवार महाविद्यालय, थाळनेर -प्रांतिक वेशभुषा,साने गुरुजी माध्य.व उच्च माध्य. विद्यालय,विखरण – भारतातील पारंपारिक व्यवसाय,महात्मा गांधी प्राथ. व माध्यमिक आश्रम शाळा, रोहिणी – आदिवासी क्रांतिकारक व संस्कृती या शाखांनी वरिल विषयावर देखावा सादर केला.यावेळी ध्वजपुजन व वंदन करण्यात आले.यासाठी किसान विद्या.प्रसारक संस्था, आर.सी.पटेल,आदिजनता,नगर पालिकेच्या शाखांमधील विद्यार्थी,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सुत्रसंचालन ए.ए.पाटील यांनी केले तर आभार किसान विद्या.प्रसारक संस्थेचे सचिव निशांत रंधे यांनी मानले.