बातमी कट्टा:- शेतकऱ्याच्या मोटरसायकल डिक्कीतून भरदिवसा एक लाख 83 हजारांची रोकड चोरी झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याबाबत पोलीस स्टेशनात नोंद करण्यात आली आहे.बँक खात्यातून पैसे काढल्यानंतर पिशवीत गुंढाळून मोटारसायकलीच्या डिक्कीत ठेवले होते.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर तालुक्यातील भोरखेडा येथील शेतकरी सुदामसिंग भगवानसिंग राजपूत यांच्या शेतातील केळी पिकाची तोडणी झाली होती.त्याचे पेमेंट बँकखात्यात जमा झाले होते.ते पैसे काढण्यासाठी सुदामसिंग राजपूत हे काल दि 17 रोजी दुपारच्या सुमारास शिरपूर शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र येथे आले होते. तेथे त्यांनी एक लाख 83 हजारांची रक्कम खात्यातून काढली व बँकेतच ते पैसे मोजले व त्यानंतर एक लाख 83 हजारांची रोकड,पँनकार्ड,पासबुक व किसान क्रेडीट कार्ड,आधार कार्ड हे सर्व सोबत आणलेल्या पिशवीत गुंडाळून ते डिक्कीत ठेवले.मोटारसायकल सुरू केली मात्र पाऊस सुरु झाल्यानंतर सुदामसिंग राजपूत हे बँक ऑफ महाराष्ट्र बँकेच्या पुढे असलेल्या वळणावर जाऊन थांबले, त्यानंतर पाऊस बंद झाल्याने मोटारसायकलीने शिरपूर पिपल्स बँक येथे पोहचले व तेथे मोटारसायकल उभी करुन डिक्कीतूंन पैसांची पिशवी काढण्यासाठी डिक्की उघडली असता त्यात पिशवी दिसून आली नाही. सुदामसिंग राजपूत यांनी याबाबत तात्काळ घरच्या मंडळींना माहिती देऊन पोलीसांना कळवले त्यानंतर सि.सि.टी.व्ही कॅमेराची देखील तपासणी करण्यात आली आहे.याबाबत सुदामसिंग राजपूत यांनी शिरपूर शहर पोलीस स्टे शनात नोंद केली आहे.