अरे बाप्परे, मालवाहू डंप्परचे आठ टायर चोरले….

व्हिडीओ बातमी

बातमी कट्टा:- शिरपूरात चोरांनी चोरीची हद्दच पार केली असून चक्क उभे असलेल्या मालवाहू डंपरचे आठ टायर चोरी केल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे. याबाबत शहर पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी पोलीसांकडून चौकशी करण्यात येत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर शहरालगत शिरपूर फाटा जवळील मुंबई आग्र गावकरी हॉटेल येथे अंबालाल राजपूत रा.आमोदे यांनी आपले डंपर उभे केले होते.मात्र रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चक्क उभ्या डंप्परचे टायर खोलून चोरून नेल्याचे उघड झाले.घटनेवरील हॉटेलचे सीसीटीव्ही कॅमेराची देखील मोडतोड करण्यात आली आहे तर याच परिसरात ट्रॅक्टरच्या शोअरुम मधून डिझेल तर एका हॉटेलात चोरी झाली आहे.चक्क उभ्या डंप्परचे टायर चोरी झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्यासह पथक दाखल झाले होते.घटनास्थळी पोलीसांंकडून चौकशी सुरु आहे.

WhatsApp
Follow by Email
error: