बातमी कट्टा:- कर्तव्य बजावत असतांना सहकाऱ्यांसोबत कमी तापमान व अधिक बर्फ असलेल्या सियाचीन या ठिकाणी हवामानाच्या दुष्परिणामामुळे शरीरातील रक्तवाहिन्या गोठल्याने धुळे जिल्ह्यातील न्याहळोद येथील सैनिक मनोहर रामचंद्र पाटील यांच्यावर उपचार सुरू असतांंना त्यांची काल दि 5 रोजी प्राणज्योत मालवली.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार धुळे तालुक्यातील मनोहर रामचंद्र पाटील वय 42 हे 2002 साली भारतीय सैन्यात भरती झाले होते.कमी तापमान व अधिक बर्फ असलेल्या सियाचीन ग्लेशियर या ठिकाणी ऑपरेशन मेघदूत मध्ये कर्तव्य बजावत असतांना जुलै 2022 मध्ये हवामानाच्या दुष्परिणामामुळे तेथे अडकल्याने सैनिक मनोहर पाटील यांच्या शरीरातील रक्तवाहिन्या गोठल्याने त्यांना उलट्या व डोकेदुखी सुरु झाल्याने उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.परंतू काल दि 5 रोजी सैनिक मनोहर पाटील यांना विरमरण आले.काही महिन्यांतच ते सेवानिवृत्त होणार होते.
मनोहर पाटील हे न्याहळोद येथील रामचंद्र पाटील यांचे सगळ्यात लहान सुपूत्र होते.त्यांना विरमरण आल्याची माहिती सर्वत्र पसरताच न्याहळोदसह संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.