बातमी कट्टा:- धुळे शहरातील नकाणे तलाव ओसंडून वाहू लागल्याने पुराच्या पाण्यामुळे धुळे शहरालगत असलेल्या ए.सी.पी.एम. मेडिकल कॉलेजच्या रस्त्यावर पुराचे पाणी वाहु लागल्याने कॉलेजचा आणि रुग्णालयाशी संपर्क तुटला आहे.
एसीपीएम या मेडिकल कॉलेजला जोडणारा रस्त्यावर नकाने तलाव पुराच्या पाण्यामुळे संपर्क तुटला आहे.यामुळे महाविद्यालयाचा आणि रुग्णालयाचा संपर्क तुटलेला आहे. त्यामुळे रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना अडचणींचा सामना करावा लागला.रात्री उशिरापर्यंत या रूग्णालयाशी संपर्क तुटलेला होता. या ठिकाणी असलेल्या पुलाची उंची वाढवण्याची मागणी वारंवार करूनही त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.यामुळे नागरिकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केलेले आहे.